थळ येथे आयुष्मान भव: शिबीर संपन्न शिबिरात नागरिकांना 218 आयुष्मान कार्ड व 112 आभाकार्डचे वाटप


रायगड दि.5(जिमाका) :-  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग व ग्रुप  ग्रामपंचायत थळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शंकरा आय केअर यांच्या सहकार्याने थळ बाजार येथे (दि.5 डिसेंबर) रोजी आयुष्मान भव: अंतर्गत तपासणी शिबीर संपन्न झाले.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, पंचायत समिती अलिबागचे माजी सदस्य गजानन बुंदके, थळ ग्रामपंचायत सरपंच सुनिल पत्रे, सदस्य विशाल बुंदके, नरेश कोळी, ग्रामसेवक नितेश तेलगे, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन दिलेश चटके, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

     या शिबिरासाठी जिल्हा रुग्णालयाचे पथक थळ जिल्हा परिषद शाळा येथे विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या तपासणी करिता उपस्थित होते. या शिबिरांतर्गत 18 वर्षावरील पुरुषांची जनरल तपासणी तसेच रक्ताची चाचणी, त्याचप्रमाणे उपस्थितांचे सिकलसेल, थायरॉईड, सीबीसी आदी चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शंकरा आय केअर यांच्यामार्फत मोतीबिंदू तसेच डोळ्यांच्या अन्य तपासणी करण्यात आल्या.  मोतीबिंदू आढळलेल्या  7 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्याकरिता पनवेल येथे शंकरा आय केअरच्या मुख्यलयात नेण्यात आले.

 आमदार महेंद्र दळवी यांच्या सहकार्याने लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिव्यांगाना साहित्याचे वाटप करण्यात आले.  तसेच 218 नागरिकांचे आयुष्मान कार्ड व 112 नागरिकांचे आभाकार्ड काढण्यात आले. तसेच अवयवदान संकल्प पत्र भरण्याचे आवाहन करण्यात आले. या तपासणी शिबीरात सर्व विभागांतर्गत 410 ग्रामस्थांनी लाभ घेतला.

      हे आयुष्मान भव: शिबीर यशस्वी करण्याकरिता अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.शीतल जोशी -घुगे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.आशिष मिश्रा यांचे सहकार्य लाभले असून, तपासणी करीता वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास पवार, डॉ.मोनिसा घोडके यांच्यासमवेत एनटीसीपीचे सामाजिक कार्यकर्ते  सुशील साईकर, डीईआयसी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदीप भोईर, नेत्र समुपदेशक अक्षय गोरे, सिकलसेल समुपदेशक प्रतिम सुतार, सिकलसेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ दीपा म्हात्रे, एचएलएल प्रयोगशाळा तंत्रज्ञ रोहन रत्नाकर, अझहर, फार्मासिस्ट दीपेश घरत, आभाकार्ड डीइओ दर्शन पाटील आदी उपस्थित होते.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक