राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि. 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ


रायगड, दि.8 (जिमाका):- क्षेत्रीय स्तरावर सध्या व्यापक प्रमाणावर सुरु असलेले वंध्यत्व निवारण शिबीरे इ. लक्षात घेता या योजनांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांना अर्ज भरता यावे, यासाठी सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली, असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सचिन देशपांडे यांनी दिली आहे.

सन 2023-24 या वर्षासाठी ah.mahabms या प्रणालीवर राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण व जिल्हा वार्षिक योजना राबविण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्वीकारणे व जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन पडताळणी करून निवड पूर्ण करणे याची मुदत दि. 8 डिसेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे.

यासाठीचे  नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :- दि.9 नोव्हेंबर ते दि.15 डिसेंबर 2023 पर्यंत सन 2023-24 साठी ऑनलाईन अर्ज स्विकारणे, जुने लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आणि जिल्हा स्तरावर कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे, यासाठी एकूण कालावधी 37 दिवस. दि.16 व दि.17 डिसेंबर 2023 डाटा बॅकअप करणे, एकूण कालावधी 2 दिवस. दि.18 ते दि.20 डिसेंबर 2023, सन 2023-24  च्या लाभार्थ्यांची रॅडमायझेशन पध्दतीने प्राथमिक यादी तयार करणे,  एकूण कालावधी 3 दिवस. दि.21 डिसेंबर 2023 राखीव, एकूण कालावधी 1 दिवस. दि.22 ते दि.26 डिसेंबर 2023, सन 2023-24  मधील नवीन प्राप्त अर्जांच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर  कागदपत्रे पडताळणी करुन निवड पूर्ण करणे. एकूण कालावधी 5 दिवस. दि.27 ते दि.29 डिसेंबर 2023, सर्व लाभार्थी मार्फत कागदपत्रातील त्रुटी पूर्तता, एकूण कालावधी 3 दिवस. दि.30  डिसेंबर 2023, कागदपत्रे अंतिम पडताळणी, एकूण कालावधी 1 दिवस. दि.31 डिसेंबर 2023 पात्र अंतिम लाभार्थी यादी तयार, कालावधी 1 दिवस.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड