औद्योगिक क्षेत्रातील अडचणींचे निराकरणासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती



अलिबाग, जि. रायगड, दि.26 (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांना सद्यस्थितीतील लॉकडाऊनमुळे त्यांच्या कच्च्या मालाचा पुरवठा, उत्पादन प्रक्रिया व पक्क्या मालाची निर्यात यामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.  त्याकरिता औद्योगिक क्षेत्रातील अडचणींचे निराकरण करण्याकरिता पोलीस विभागामार्फत कर्जत व खालापूर तालुक्यांसाठी श्री.रणजित पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर दू.क्र.02192-270595 भ्रमणध्वनी 9168465742 ई-मेलआयडी sdpo.khalapur.rd@mahapolice.gov.in /rgdsdpokhalapur1@gmail.com, पेण,अलिबाग,रोहा व सुधागड तालुक्यांसाठी श्री.विजयकुमार सुर्यवंशी,उपविभागीय पोलीस अधिकारी,रोहा दू. क्र.02194-264720 भ्रमणध्वनी 9975631374- मेल आयडी sdpo.roha.rd@mahapolice.gov.in/rgdsdporoha@gmail.com,महाड व माणगाव तालुक्यांसाठी श्री.अरविंद पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,महाड दू. क्र.02145-222170 भ्रमणध्वनी 9702744555-मेल आयडी sdpo.mahad.rd@mahapolice.gov.in/rgdsdpomahad@gmail.com,महाड या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  तरी जिल्ह्यातील उद्योगांची उत्पादन प्रक्रिया सुरळीत ठेवण्यास निर्माण झालेल्या अडचणी संबंधात वरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक रायगड-अलिबाग अनिल पारस्कर यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक