“रक्तदान हे श्रेष्ठ दान” नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे जवळच्या रक्तपेढीशी संपर्क करावा स्वच्छता व सोशल डिस्टंन्सिंग पाळावे --- जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी



अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका) : करोना विषाणूच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग चिंताग्रस्त झाले आहे. त्याचा प्रभाव भारतावरही आहे. त्यानुषंगाने  इतर रोगांनी पिडीत व्यक्तींना रक्तदानाची आवश्यकता असल्यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.   
नजीकच्या काळात रक्त व रक्तघटकांचा तुटवडा भासण्याची शक्यता असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करणे आवश्यक आहे.   परदेश प्रवास न केलेले नागरीक व ज्याचे आरोग्य स्वस्थ आहे, अशा नागरिकांनी कोणत्याही प्रकारे गर्दी न करता त्यांना ठरवून दिलेल्या वेळेमध्ये मोठया प्रमाणावर रक्तदान करावे, रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याने नागरिकांनी स्वच्छता बाळगून तसेच सोशल डिस्टंन्सिंग पाळून जवळच्या रक्तपेढीमध्ये जावून रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक