श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड तर्फे आरोग्य सुविधांसाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द



अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड (र.नं.A17-कोलाबा) यांच्यातर्फे भगवान श्री महावीर स्वामी जन्म कल्याण निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील रायगड जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये करोना संकटाच्या आरोग्य सुविधांसाठी रु. दोन लाख पंचवीस हजार रुपयांचा धनादेश जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी या ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी- श्री.प्रकाश जैन, माजी मॅनेजिंग ट्रस्टी- श्री.प्रकाश मुलचंद जैन, ट्रस्टी- विक्रम सोहनराज जैन,ट्रस्टी-अजित भिकमचंद जैन हे उपस्थित होते.
राष्ट्रीय आपत्तीच्या या परिस्थितीत श्री जैन श्वेतांबर श्री पद्मप्रभु महाराज देवालय ट्रस्ट, पोयनाड या ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या या दानशूरपणाचे जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी विशेष कौतुक केले आणि समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी, सस्थांनी अशा प्रकारे मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.  
तसेच आतापर्यंत ज्या कंपन्यांनी, समाजसेवी संस्थांनी राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून या करोना विषाणूच्या संकट काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, मदतनीस यांना मास्क्, सॅनिटायजर, ऑक्सिजन सिंलिंडर्स दान केले आहेत वा विनामूल्य पुरविले आहेत, ज्या स्वयंसेवी संस्थांनी बाहेरील राज्यातील मजूरांना व अनाश्रित लोकांना अन्न पुरविले आहे व पुरवित आहेत, त्यांचेही जिल्‍हाधिकारी श्रीमती चौधरी यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक