150 आदिवासी कुटुंबांना घरपोच धान्य वाटप उपविभागीय पोलीस अधिकारी व कर्जतच्या व्यापारी मित्रांचा स्तुत्य उपक्रम




अलिबाग, जि. रायगड, दि.28 (जिमाका): करोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे रोज मजूरीवर गुजराण करणाऱ्या कर्जत तालुक्यातील आदिम जमात असणाऱ्या कातकरी कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर व कर्जतचे व्यापारी अमित पारस ओसवाल,मनोज पारस ओसवाल,जयंतीलाल शेषमाल परमार यांच्यावतीने आज आदिवासींना त्यांच्या घरी जाऊन धान्याचे वाटप करण्यात आले.
   तालुक्यातील जांभूळवाडी,वडाचीवाडी व वंजारवाडी येथील 150 कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ, दोन किलो साखर, चहा, मीठ, मसाला पावडर, दोन किलो तेल, हळद आदि समावेश असलेले किट देण्यात आले .
 ही मदत वाटप करताना शासनाने घालून दिलेले सोशल डिस्टंन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. दोन व्यक्तींमध्ये किमान मीटरभर अंतर पाळत, तोंडावर मास्क किंवा रूमाल लावून एका घरातील एकच व्यक्तीला बाहेर बोलावून, शिस्तबध्दपणे, गोंधळ-गडबड न करता या मदतीचे वाटप करण्यात आले.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक