पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती,संस्थांनी अर्ज सादर करावेत

 

अलिबाग,जि.रायगड, दि.11 (जिमाका):- शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थाना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारने गौरविण्यात येते. सन 2018-19 व 2019-20 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थाकडून दि. 31 मार्च 2021 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

              पुरस्काराचे स्वरुप व अहर्ता पुढीलप्रमाणे :-

राज्यस्तरीय पुरस्कार :- रु 1,00,001/- रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 25 वर्षाचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या महिला तो पुरस्कार मिळाल्यानंतर 5 वर्ष पुरस्कारासाठी पात्र रहाणार नाहीत.

विभागीय पुरस्कार :-  रु. 25,001 /- रोख स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 7 वर्ष कार्य असावे. नोंदणीकृत संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासून अलिप्त असावी. तसेच तिचे कार्य व सेवा पक्षातीत व राजकारणापासून अलिप्त असावी.

जिल्हास्तरीय पुरस्कार :-रु.10,001/- रोख, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे, त्या महिलांना हा पुरस्कार अनुज्ञेय राहाणार नाही.

              या अहर्ता असणाऱ्या इच्छुक व्यक्ती,संस्थानी अर्हतेशी संबंधित खालील आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.

    पुरस्कारासाठी आवश्यक कागदपत्र-

अ) राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार- प्रस्तावधारकांची माहिती केलेल्या कार्यांचा तपशिल, वृत्तपत्र,फोटो इ. सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहे, यापूर्वी पुरस्कार मिळाले आहेत काय? असल्यास तपशिल.

ब) विभागीयस्तर पुरस्कार- संस्थेची माहिती व कार्याचा अहवाल, वृत्तपत्र कात्रणे,संस्थेस यापूर्वी पुरस्कार मिळाला आहे काय? असल्यास तपशिल, संस्था नोंदणी प्रमाणपत्र व घटनेची प्रत.

इच्छुक व्यक्ती/संस्थानी विहीत नमुन्यातील अर्जासाठी तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड अलिबाग, नीलपुष्प बिल्डिंग, MIDC ऑफिस समोर, नागडोंगरी चेंढरे, ता. अलिबाग. जि. रायगड फोन नं 2141-225321/295321 या कार्यालयाशी संपर्क साधावा.

               पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अर्जामधून निवड समितीकडून ज्या समाजसेविका/संस्था यांची निवड होईल त्यांनी  1) उपविभागीय अधिकारी यांचे विनादुराचार प्रमाणपत्र, 2) गैरवर्तनासंबधी खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे पोलीस विभागाचे प्रमाणपत्र 3) सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र, 4) संस्था 10 वर्षांपासून महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यारत असल्याचा मागील 3 वर्षाचा अहवाल, 5) संस्थेच्या घटनेची प्रमाणित प्रत ही कागदपत्रे व प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.

      तरी इच्छुक व्यक्तींनी, संस्थांनी त्यांचे प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावेत, असे आवाहन जिल्हा महिला  व बाल विकास अधिकारी श्रीमती उज्वला पाटील यांनी केले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक