जिल्ह्यात जागतिक महिला दिनानिमित्त कृषी विभाग व आत्मामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न

 


अलिबाग,जि.रायगड,दि.9 (जिमाका):-  संचालक, आत्मा, पुणे कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार काल (दि. 8 मार्च रोजी) जागतिक महिला दिनानिमित्ताने जिल्ह्यात कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणे (आत्मा) मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

            खालापूर, पनवेल, कर्जत, उरण, मुरूड, तळा, रोहा, पाली, पोलादपूर या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने महिला शेतकऱ्यांचे नागली पिक मूल्यवर्धनाचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये दापोली येथे नागली मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतलेल्या महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.

            अलिबाग तालुक्यात हिराकोट तलावाजवळ भरविण्यात आलेल्या संत शिरोमणी सावतामाळी रयत बाजाराचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रयत बाजारामध्ये 25 महिला शेतकऱ्यांनी त्यांचा उत्पादित शेतमाल विक्री केला.

            रोहा तालुक्यात नागली मूल्यवर्धन प्रशिक्षणासह विकेल ते पिकेल अभियानांतर्गत महिला शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आवश्यक विक्री साहित्याचे वितरण करण्यात आले.

            पोलादपूर तालुक्यामध्ये नाचणी प्रशिक्षणासह आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात 35 महिला शेतकऱ्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये कृषी व संलग्न विभागाच्या योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये 356 महिला शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीम. उज्वला बाणखेले यांनी दिली आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक