पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे..

      शुक्रवार दि. 04 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8.30 वा. सुनिती शासकीय निवासस्थान, मुंबई येथून शासकीय वाहनाने खैरकाटी, आदिवासीवाडी-रानसई ता.उरणकडे प्रयाण. सकाळी. 10:30 वा. खैरकाटी, आदिवासीवाडी-रानसई ता.उरण येथे आगमन व ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत पिण्याचे पाणी संचाचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. (मार्गे गव्हाणफाटा), सकाळी 11.15 वा.खैरकाटी, रानसई ता.उरण येथून शासकीय वाहनाने उरणकडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. उरण येथे आगमन व सिडको आणि शासनाने संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : सिडको ट्रेनिंग सेंटर, केअर पाँईट हॉस्पिटलजवळ, बोकडविरा, उरण, दुपारी 12.30 वा. राखीव. (जे.एन.पी.टी.विश्रामगृह,उरण), दुपारी 1.30 वा. जे.एन.पी.टी.विश्रामगृह,उरण येथून शासकीय वाहनाने लोहगड, ता.मावळ, जि.पुणेकडे प्रयाण. सायं.4.00 वा. मावळ येथे आगमन व खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित गडकिल्ले संवर्धन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ : लोहगड किल्ला, ता.मावळ, जि.पुणे, सायं. 5.30 वा. लोहगड ता.मावळ येथून शासकीय वाहनाने ताम्हीणी घाट मार्गे सुतारवाडी ता.रोहाकडे प्रयाण. रात्रौ 8.30 वा. सुतारवाडी ता.रोहा निवासस्थान येथे आगमन व राखीव.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक