सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी प्रशासक निवड प्रक्रिया सुरू इच्छुकांनी अर्ज सादर करण्याचे सहकार विभागाचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.04 (जिमाका) : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ,78.78 अ अन्वये सहकारी गृहनिर्माण संस्थावर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांचे पुरवणी पॅनेल तयार करण्यासाठी इच्छुकांचे अर्ज मागविण्यात यावेत, असे विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था कोकण विभाग, नवी मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

             महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 77 अ,78,78 अ अन्वये कोकण विभागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या प्राधिकृत अधिकारी (प्रशासक) यांच पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अँड ए.) उच्चतम सहकार पदविका (एच. डी.सी.) धारक, चार्टर्ड अकाऊटंट (सी.ए.)/इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्कर्स अकाऊटंट (आय.सी.डल्ब्यू ए.)/कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) सहकार खात्यातील प्रशासन/लेखापरीक्षण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, नागरी/कर्मचारी सहकारी बँकांमध्ये व्यवस्थापक यांच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

              अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,ठाणे/पालघर/ रायगड/रत्नागिरी/सिंधुदूर्ग व त्यांच्या अधिनस्त तालुका कार्यालयात दि.01 ते दि.31 डिसेंबर 2020 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील.

             अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे: केवायसी नॉर्मस- उदा.जन्म दाखला, रेशन कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो इ 2. अनुभवाचा तपशिल- संस्थेचे नाव, कामकाजाचा तपशिल, पद व कालावधी (पद,कामाचे स्वरुप इ.), संगणकीय ज्ञान आवश्यक उदा.एम.एस.सी.आय.टी वा अन्य 4. मा.न्यायालयाने शिक्षा ठोठावलेली नसावी.

            रायगड जिल्ह्यातील उपरोक्त पॅनल संदर्भात अर्ज जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग, शुक्रतारा बिल्डिंग, कामत आळी, सत्कार प्रेससमोर, मु.पो.ता.अलिबाग, जि.रायगड या पत्यावर पाठविण्यात यावेत, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रायगड-अलिबाग गोपाळ मावळे यांनी कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक