जागतिक एड्स नियंत्रण दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात सेल्फी स्टॅन्ड चे उद्घाटन

 


     

लिबाग,जि.रायगड दि.03 (जिमाका) :-  जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, वडाळा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, रायगड, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग यांच्यामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग येथे जिल्हा सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी, रायगड जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, जिल्हा न्यायालय,अलिबाग तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते सेल्फी स्टॅन्डचे उद्घाटन करण्यात आले.

  यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, अँड.भूषण साळवी, जिल्हा सरकारी वकील, जिल्हा न्यायालय रायगड, जिल्हा सहाय्यक लेखा  रविंद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम अँड ई सौ. रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक  कार्यक्रम श्रीम. संपदा मळेकर  डापकु, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ  सौ. सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, मोबाईल आयसीटीसी व्हॅन क्लिनर रुपेश पाटील, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार, क्लिनर संकेत घरत, दि रूरल अँड यंग  फाऊंडेशन  संस्था प्रतिनिधी  सुशील साईकर, रायगड जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, जिल्हा न्यायालय अलिबाग मधील सौ. मगर हे उपस्थित होते. 

   हा कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी तसेच एचआयव्ही एड्सला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने तसेच जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने व डापकु टीम जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड- अलिबाग यांच्याकडून कार्यक्रमाचे नियोजन तसेच  अंमलबजावणी करण्यात आली.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक