जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कलम 144 नुसार सुधारित प्रतिबंधात्मक आदेश केले जारी

 


     अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) : फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.01 नोव्हेंबर 2020 रोजीच्या सकाळी 06.00 वा. पासून ते दि.30 नोव्हेंबर 2020  रोजीच्या रात्री 12.00 वा. पर्यंत शासनाच्या अधिसूचनेत नमूद प्रतिबंधित केलेली कृत्ये करण्यास मनाई राहील, असे आदेश जारी करण्यात आले होते, आता शासनाकडून नव्याने लॉकडाऊन कालावधी दि.31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढवून सुधारित आदेशान्वये (Easing of Restrictions & Phasewise opening of lockdown. - MISSION BEGIN AGAIN) लागू केलेले निर्बंध तसेच सुरु करण्यास मान्यता दिलेल्या बाबी यापुढेही सुरु राहतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 च्या तरतुदीनुसार रायगड पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात दि.30 नोव्हेंबर 2020 रोजीच्या रात्री 12.00 वा. पासून ते दि.31 डिसेंबर 2020 रोजीचे रात्री 12.00 वा. पर्यंत नव्याने प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी निधी चौधरी यांनी जारी केले आहेत. या अधिसूचनेद्वारे दिलेल्या अथवा यानंतर वेळोवळी पारीत केल्या जाणाऱ्या आदेशानुसार प्रतिबंधित केलेली अथवा केली जाणारी कृत्ये करण्यास मनाई राहील, असेही आदेश जारी करण्यात आले आहेत.

  हे आदेश पोलीस, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, करोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनामधील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू नसतील.

   या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक