दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था होणार दिव्यांग प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.3 (जिमाका) :- सन 2020- 21 मध्ये रायगड जिल्हा परिषदेने आपल्या मूळ अर्थसंकल्पात         5 टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना दिव्यांग प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या लाभासाठी पुढीलप्रमाणे निकष  निश्चित केलेले आहेत.

  दिव्यांग व्यक्ती रायगड जिल्ह्याचा किमान 10 वर्षे रहिवाशी असावा. तसेच  संस्थेसंदर्भात संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणीकृत असावी, दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा, अर्जासोबत दिव्यांग क्षेत्रातील कार्याचा इतिवृतांत किमान 200 शब्दांत मराठी मध्ये असावा, दिव्यांग क्षेत्रात काम केलेल्या कार्याचे फोटो ,वृत्तपत्रीय कात्रणे व संस्था संदर्भात संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र सोबत जोडावे, निवड केलेल्या व्यक्तीस/संस्थेस रक्कम रू.10 हजार रोख व शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल, प्रस्ताव सादर करण्याचा अंतिम दि. 18 डिसेंबर 2020  अशी आहे.

   या पुरस्काराचे विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयाकडे उपलब्ध असून या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र व्यक्ती, संस्थांनी कार्यालयीन वेळेत संपर्क साधून दि.18 डिसेंबर 2020 पूर्वी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक