जावळी येथील शाळेत मोफत प्रवेश


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.21- अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्याकरीता जावळी ता.माणगावं येथे सन 2018-19 पासून शासकीय ‍ निवासी शाळेची  इयत्ता 6 वी ते 8 वी  च्या विद्यार्थ्यांकरिता प्रवेशप्रक्रिया दि. 1 एप्रिलपासून सुरु झाली असून मोफत प्रवेश दिला जात आहे. जावळी ता.माणगाव येथील शासकीय निवासी शाळेमध्ये प्रवेशिताकरीता आरक्षण पुढील प्रमाणे  आहे.
अनुसूचित जाती-80%, अनुसूचित जमाती-10%,अपंग प्रवर्ग-3%,विमुक्त जाती,भटक्या जमाती-5%,विशेष मागास प्रवर्ग-2%
शासकीय निवासी शाळेची वैशिष्ट्ये- शाळा विभाग व निवासाकरता स्वंतत्र इमारती. शासनामार्फत मोफत सोई पुढीलप्रमाणे- राहण्याची, जेवणाची, गणवेश, शैक्षणिक साहित्य्,निवासी साहित्य्,सुसज्ज् ग्रंथालय,प्रयोगशाळा व संगणक कक्ष, भव्य् खेळाचे मैदान व साहित्य
प्रवेशासाठी अर्ज विहीत नमुन्यात भरुन खालील कागदपत्रासह सादर करावा. विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला नसल्यास वडिलांचा,पालकांचा उत्पन्नाचा दाखला,रहिवासी दाखला (सरपंच,पोलीसपाटील), विद्यार्थ्यांच्या आधीच्या वर्षाची मार्कलिस्ट्,पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, अपंग असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे अपंग प्रमाणपत्र.
             तरी शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सहाय्यक आयुक्त्, समाज कल्याण,रायगड अलिबाग दूरध्वनी क्र. 0214-222288 किंवा सहा. शिक्षक निवासी शाळा जावळी ता.माणगांव मोबाईल नं. 8446379520 येथे संपर्क साधावा. असे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, रायगड अलिबाग यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक