सामाजिक समता सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20:- सहाय्यक आयुक्त समाज रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती निमित्त दिनांक 8 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह संपन्न झाला. यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
समता सप्ताहाची सुरुवात दि.8 एप्रिल  रोजी सामाजिक न्याय भवनात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण दलित मित्र प्रदिप किर्तने, महाड यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच दि.8 ते 13 एप्रिल दरम्यान विविध जिल्हास्तरीय शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  दि.8 रोजी इयत्ता दहावी वी बारावी च्या विद्यार्थ्यांकरीता करिअर मार्गदर्शनाबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीम. प्राची देशमुख (प्रकाशवाटा करिअर गायडन्स अँड कॉन्सलिंग संस्था अलिबाग)यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत 5 विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात लाभाचे प्रमाणपत्र देण्यात आले. दि.9 एप्रिल रोजी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरीता प्रश्नमंजूषा,पथनाट्य व्याख्यान इ. कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह महाड या वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरया विषयावर पथनाट्य सादर केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन रमेश जामकर यांनी केले. दि.10 एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्स्क, सामान्य् रुग्णालय रायगड यांच्या सहकार्याने सामाजिक न्याय भवनात रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. तसेच समता दुतामार्फत ग्रामस्तरावर पथनाट्य,लघुनाटीका इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दि.11 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असलेल्या विविध महामंडळांमार्फत बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी महामंडळाच्या व सामाजिक न्याय विभागाच्या योजनांच्या माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.  तसेच कर्जत येथे अंदाजे 100 दिव्यांगांच्या उपस्थितीत अपंग ओळखपत्र वाटप व अपंगाकरिता असलेल्या योजनांची माहिती व रोजगार मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी साईनाथ पवार (अध्यक्ष रायगड जिल्हा अपंग कर्मचारी संघ)उपस्थित होते.
दि.12 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील सात शासकीय वसतिगृहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले ते पुढीलप्रमाणे मागासवर्गीय मुलीमुलींच शासकीय वसतिगृह महाड,अलिबाग,पाली सुधागड,पनवेल गोंधळपाडा अलिबाग,तळा. तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणी व दलित वस्त्यांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत स्वच्छता अभियान राबविण्यात आले.   दि.13 एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनात समता प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वैभव गीते, सामाजिक कार्यकर्ते यांनी अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती अत्याचर प्रतिबंध अधिनियम अंतर्गत विविध कलमांची सविस्तर् माहिती दिली. जेष्ठ पत्रकार जयपाल पाटील यांनी आपत्तीव्यवस्थापन या विषयावर व्याख्यान दिले.यावेळी रायगड जिल्ह्यातील दलित मित्र पुरस्कार विजेत्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांची नावे पुढीलप्रमाणे- मधुकर गायकवाड, महाड,प्रदिप किर्तने,महाड.,केशव हाटे, महाड., मुकुंद पाटणे, हरिभाऊ शिंदे, (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार विजेते )
तसेच या सामाजिक समता सप्ताहाची सांगता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजेच दि.14 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील एस.टी.स्टँड, महेश टॉकीजच्या बाजूला असलेल्या भारतरत्न् डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय मंत्री ना.अनंत गीते व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन व मानवंदना देऊन करण्यात आली. यावेळी  जिल्ह्यातील आमदार व प्रतिष्ठित व्यक्ती, मुला-मुलींचे वसतीगृहातील विद्यार्थी, कर्मचारी, विविध महामंडळांचे अधिकारी,कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक