जिल्हास्तर क्रीडा शिक्षकांच्या प्रशिक्षण शिबीरास सुरुवात



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.19- क्रीडा व युवक सेवा संचालानालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हयातील क्रीडा शिक्षकांसाठी दि. १६ ते २५ एप्रिल, २०१८ या कालावधीत आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबीरास नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलामध्ये सुरुवात झाली आहे. या शिबीराचे उदघाटन कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषदेचे श्री.बी.एल.थोरात, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रमुख पाहुणे म्हणुन तर अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी श्री महादेव कसगावडे उपस्थित होते.
जिल्हास्तरीय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीरात जिल्ह्यतील विविध तालुक्यातून क्रीडा शिक्षक सहभागी झालेले आहेत. येत्या दहा दिवसामध्ये क्रीडा शिक्षकांना विविध १६ खेळांचे बदललेले नियम, तंत्र, क्रीडा मानसशास्त्र, खेळातील दुखापती व उपचार, डोपींग, खेळाडूंचा आहार इ. ची माहिती संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्ती व क्रीडा मार्गदर्शकांव्दारे दिली जाणार आहे. सहभागी शिक्षकांना शासनाच्या वतीने क्रीडा गणवेश देण्यात आलेला असून त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था संकुलातील वसतीगृहामध्ये करण्यात आली आहे. शिबीरामध्ये पुणे येथे राज्यस्तरावर प्रशिक्षीत झालेले मास्टर ट्रेनर्स ही मार्गदर्शन करणार असून सकाळी ते सायंकाळी या वेळामध्ये सकाळ व सायंकाळ सत्रात विविध खेळांच्या प्रात्यक्षिकाव्दारे तर दुपार   सत्रामध्ये क्रीडा विकासासाठी निगडीत  विविध विषयावर व्याख्याने आयोजित करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री संभाजी बडे, मास्टर ट्रेनर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती माधवी कोळी,मास्टर ट्रेनर यांनी केले. कार्यक्रमास श्री विशाल बोडके व श्री.सुनिल कोळी, क्रीडा अधिकारी हे उपस्थित होते.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक