लोककला व पथनाट्य पथक शासकीय निवडसूची 2021 साठी कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांनी दि.19 जानेवारी पर्यंत अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.12 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या  लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने लोककला, पथनाट्याद्वारे करण्याकरिता (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बहुरुपी, भारुड इ.) लोककला, पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. तरी याबाबत कला क्षेत्रातील अनुभवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

       इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे किंवा www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असलेला अर्जाचा नमुना व माहितीपत्रक उपलब्ध करुन घ्यावे.

      विहीत नमुन्यातील अर्ज भरुन जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अलिबाग- रायगड येथे दि.19 जानेवारी 2021 पर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम, पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरुष, वादक यांचा समावेश असावा. लोककला,पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नॉंदणीकृत असल्यास प्राधान्य. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आहे.

 

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड