15 जानेवारीला जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतींमध्ये 299 मतदान केंद्रांवर 1 लाख 77 हजार 383 मतदार मतदानाचा हक्क बजावणार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :- एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून या मतदान केंद्रावर 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे. तर या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी आपला मतदानाचा हक्क जरुर बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.   

               या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतदारांच्या आकडेवारीची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:- अलिबाग- ग्रामपंचायतींची संख्या-4, यामध्ये स्त्री मतदार 4 हजार 482, पुरुष मतदार 4 हजार 249, इतर 0, असे एकूण मतदार  8 हजार 731.  पेण- ग्रामपंचायतींची संख्या-7, यामध्ये स्त्री मतदार 5 हजार 985, पुरुष मतदार 5 हजार 853, इतर 0, असे एकूण मतदार  11 हजार 838. पनवेल- ग्रामपंचायतींची संख्या-22, यामध्ये स्त्री मतदार 26 हजार 91, पुरुष मतदार 29 हजार 205, इतर 1, असे एकूण मतदार  55 हजार 297. उरण- ग्रामपंचायतींची संख्या-6, यामध्ये स्त्री मतदार 15 हजार 688, पुरुष मतदार 15 हजार 615, इतर 1, असे एकूण मतदार  31 हजार 304. कर्जत- ग्रामपंचायतींची संख्या-8, यामध्ये स्त्री मतदार 10 हजार 170, पुरुष मतदार 10 हजार 424, इतर 0, असे एकूण मतदार  20 हजार 594. रोहा- ग्रामपंचायतींची संख्या-21, यामध्ये स्त्री मतदार 15 हजार 959, पुरुष मतदार 16 हजार 822, इतर 0, असे एकूण मतदार 32 हजार 781. माणगाव- ग्रामपंचायतींची संख्या-2, यामध्ये स्त्री मतदार 4 हजार 784, पुरुष मतदार 4 हजार 941, इतर 0, असे एकूण मतदार 9 हजार 725. महाड- ग्रामपंचायतींची संख्या-3, यामध्ये स्त्री मतदार 3 हजार 474, पुरुष मतदार 3 हजार 639, इतर 0, असे एकूण मतदार 7 हजार 113. श्रीवर्धन- ग्रामपंचायतींची संख्या-3, यामध्ये स्त्री मतदार 2 हजार 955, पुरुष मतदार 2 हजार 804, इतर 0, असे एकूण मतदार  5 हजार 759. म्हसळा- ग्रामपंचायतींची संख्या-2, यामध्ये स्त्री मतदार 1 हजार 198, पुरुष मतदार 1 हजार 119, इतर 0, असे एकूण मतदार  2 हजार 317. अशा एकूण 78 ग्रामपंचायतींमध्ये स्त्री मतदार 86 हजार 633, पुरुष मतदार 90 हजार 748, इतर 2, असे एकूण 1 लाख 77 हजार 383 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार  आहेत.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक