आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी विकास विभाग

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
दूरध्वनी-222019, ई मेल- dioraigad@gmail.com,                dioabg@rediffmail.com
                 फेसबुक : dioraigad           ट्विटरË: @dioraigad  ब्लॉग : dioraigad 
 दिनांक :- 05 ऑक्टोबर  2016                                                  लेख क्र.47
आदिवासींच्या कल्याणासाठी
आदिवासी विकास विभाग

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी विभागांतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मोफत आरोग्य तपासणीसाठी मोबाईल हेल्थ युनिट सुरु करण्यासंदर्भात आदिवासी विकास विभाग आणि उर्वी अशोक पिरॅमल फाऊंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार काही दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यामध्ये पाथरज या गावी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे हस्ते हे मोबाईल हेल्थ युनिट देण्यात आले.
 आदिवासींच्या संदर्भातील कुपोषणाबाबत सरकार संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथे स्पष्ट केले.  तसेच याबाबत राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचेही सांगितले.  एकूणच आदिवासींच्या विकासासाठी शासन कटिबध्द आहे.  रायगड जिल्ह्यात प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणमार्फत आदिवासी विकासाच्या विविध योजनांची माहिती देणारा हा लेख…
           
आदिवासी समाजातील लोकांच्या कल्याणासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणी करण्यासाठी 22 एप्रिल 1983 रोजी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करण्यात आली आणि 1984 पासून आदिवासी विकास स्वतंत्रपणे कार्यरत आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक,नागपूर व अमरावती येथे चार अपर आयुक्त व 29 एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय असून त्यांच्या मार्फत मागासवर्गीय कल्याणाच्या राज्य व केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी  केली जाते.  त्यापैकीच ठाणे अपर आयुक्त कार्यालयांतर्गत  प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण हे एक प्रकल्प कार्यालय आहे.
            प्रकल्प कार्यालय, पेणच्या कार्यक्षेत्रात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग ह्या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो.  प्रकल्प कार्यालयांतर्गत समाविष्ट 3 जिल्ह्याची सन 2011 च्या जनगणनेप्रमाणे लोकसंख्या खालीलप्रमाणे.  रायगड जिल्ह्यात एकूण 15 तालुके असून 26 लाख 34 हजार 200 इतकी लोकसंख्या आहे.  त्यापैकी आदिवासी लोकसंख्या 3 लाख 5 हजार 125 इतकी असून 11.58 इतकी टक्केवारी आहे.   रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 9 तालुके असून 16 लाख 15 हजार 69 इतकी लोकसंख्या आहे.  त्यापैकी आदिवासी लोकसंख्या 20 हजार 374 इतकी असून 1.26 इतकी टक्केवारी आहे.    सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 08 तालुके असून 8 लाख 49 हजार 651 इतकी लोकसंख्या आहे.  त्यापैकी आदिवासी लोकसंख्या 6 हजार 976 इतकी असून 0.82 इतकी टक्केवारी आहे.  
            रायगड जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात कातकरी जमातीची लोकसंख्या आढळते.  कातकरी ही केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेली आहे.  प्रकल्प कार्यालयांतर्गत समाविष्ट जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यामध्ये ओटिएसपी, माडा व मिनिमाडा क्षेत्रांचा समावेश होतो.
शासकीय आश्रमशाळा
            प्रकल्प कार्यालय पेण अंतर्गत 16 शासकीय आश्रमशाळा,  11 अनुदानित आश्रमशाळा, 13 शासकीय वसतीगृह व 4 नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा व 1 सैनिकी शाळा कार्यरत आहेत.  रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात 5 (पाथरज, चाफेवाडी,भालिवडी, पिंगळस व कळंब) शासकीय आश्रमशाळा,  पेण 3 (वरसई, सावरसई व वरवणे),  अलिबाग 1 (कोळघर), रोहा 1 (सानेगाव), सुधागड पाली तालुक्यामध्ये 1 (नेनवली), माणगाव 1 (नांदवी) आणि पनवेल 1(साई) अशा एकूण 14 शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत.  तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वेरळमध्ये 1 व मंडणगड मध्ये 1 अशा एकूण 2 शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहेत.
             शासकीय वसतिगृहांपैकी रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यामध्ये 2 (पेण मुलाचे व मुलींचे),  पनवेल 3 (पनवेल मुलांचे जुने,मुलांचे नवीन व मुलींचे), सुधागड-पाली  2 (मुलांचे व मुलींचे),कर्जत 3 (नेरळ मुलांचे, नेरळ मुलींचे व कर्जत मुलांचे), महाड 1 (मुलांचे ),असे एकूण 11 आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत.  तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात मुलांचे 1 व मुलींचे 1 असे एकूण 2 शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत.
अनुदानित आश्रमशाळांपैकी कर्जत तालुक्यामध्ये 1 (माणगाववाडी), पनवेल 2 (चिखले आणि वाकडी),  सुधागड 3 (वावळोली, चिवे आणि पडसरे),पेण 1 (रानपाखरं),उरण 1 (चिरनेर), खालापूर 1 (उंबरे), माणगाव 1 (उत्तेखोल), महाड (तळोशी) अशा एकूण 11 अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत. पनवेल तालुक्यामध्ये 4 नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळा तसेच चिखले येथे 1 सैनिकी शाळा कार्यरत आहेत.
            प्रकल्प कार्यालय पेण अंतर्गत असलेल्या 16 शासकीय आश्रमशाळांमध्ये 5667 विद्यार्थी,11 अनुदानित आश्रमशाळांमध्ये 5250 विद्यार्थी, नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये 917 विद्यार्थी, सैनिकी शाळेमध्ये 163 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  तसेच 13 शासकीय वसतीगृहांमध्ये ऑगस्ट 2016 अखेर 1102 विद्यार्थी प्रवेशित आहेत.
             अशाप्रकारे या विभागामार्फत  जिल्ह्यातील आदिवासी विकासाचे कार्य सुरु आहे. तसेच आदिवासी विकास विभागामार्फत पुणे येथे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या मदतीने आदिवासी विकासाचे कार्य सुकर होण्यासाठी काही उपक्रम राबविले जातात.  यात महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींचा मानव वंश शास्त्रीय अभ्यास करणे.  महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या चालीरिती,रुढी व परंपरा यांचा अभ्यास करणे.   अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना MPSC/UPSC प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करणे. आदिवासी कला व संस्कृती जतन करण्याकरिता आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय.   अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी ऑनलाईन करण्यासाठी आदि प्रमाण प्रणाली  माहिती https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  आदिवासी योजनाच्या अधिक माहितीसाठी आदिवासी विकास विभागाचे संकेत स्थळ : https//tribal.maharashtra.gov.in  येथे पहावे.
0000
                                    संकलन
                              डॉ.राजू पाटोदकर
जिल्हा माहिती अधिकारी,


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड