थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.20 :जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध कर्ज योजनेंतर्गत स्वयंरोजगाराकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांचे जिल्हा कार्यालय रायगड मार्फत अल्प व्याजदराने कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे.   महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या जिल्ह्यातील लाभार्थांसाठी महामंडळाकडून थकीत व्याज रकमेवर दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे.   ही योजना ठराविक कालावधीसाठी असून संबंधित लाभार्थ्यांनी लाभ घेऊन थकीत कर्जाची परतफेड करुन कर्ज खाते बंद करावे, असे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक, रायगड एन.व्ही.नार्वेकर यांनी केले आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक