विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूक पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न






अलिबाग दि.16 सप्टेंबर- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक पूर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात संपन्न झाली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर जिल्हाधिकारी भरत शितोळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी रोहयो रविंद्र मठपती आदि  उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा निहाय आढावा घेतला.  यावेळी मतदार यादी अद्यावतीकरण तसेच निवडणूक पूर्वतयारी व ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्राबाबत केली जात असलेली जनजागृती याबाबत आढावा घेण्यात आला. निवडणूक विषयक कामे यंत्रणेने दक्षता ठेवून व विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, जिल्ह्यातील निवडणूक शांततेच्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी  आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी तसेच मतदारांमध्ये जनजागृतीवर भर देण्यात यावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व समिती प्रमुख, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक