शेतकऱ्यांनी पडिक जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावण्याचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.16 (जिमाका) :-  शेतकरी त्यांच्या पडीक जमिनीवर बांबू लागवड करून पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लावू शकतात व स्वत:चे आर्थिक उत्पन्न बांबू उपजाच्या माध्यमातूनसुध्दा वाढवू शकतात. जागतिक बांबू दिवसाच्या निमित्ताने जास्तीत जास्त बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण कमी करण्याबरोबर बांबू कारागिरांना त्यांच्या रोजगाराची हमी देण्याची परिस्थिती निर्माण करण्याचा सर्वांनी निश्चय करावा,  असे आवाहन वृत्त समन्वयक ठाणे, वनवृत्त श्री.अजय पिलारी सेठ यांनी केले आहे.

दरवर्षी 18 सप्टेंबर या दिवशी जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बांबू हे बहुउपयोगी वनउपज असून आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यास हिरवे सोने असे संबोधले जाते. बांबूचा उपयोग करून मनुष्य जीवनात विकासाची वाटचाल सुरू झाल्याचे इतिहाससुद्धा साक्ष आहे. पुरातन काळात सुद्धा बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात घरबांधणी, अवजारे, हत्यारे व घरगुती वस्तूसाठी करण्यात येत असत. बांबू कारागिरी त्या काळापासून विकसित होत गेली व वस्तूमध्ये सुद्धा सुधार होत गेला.

 मोठ्या प्रमाणात बांबू सहज उपलब्ध होत होते व त्या काळात सर्वसाधारणतः सर्वांना आवश्यक वस्तू बांबूचा उपयोग करून बनविण्याची कला अवगत होती. आजपर्यंत आदिवासी पाड्यांमध्येसुद्धा जवळ-जवळ सर्वांना बांबूचा वापर करून त्यांना लागणारी वस्तू तयार करता येत होती.

 आधुनिक युगामध्ये बांबू वस्तूंना प्लास्टिकचा पर्याय आल्याने आदिवासी बांधवांचे कुशलतेचा उपयोग कमी होऊ लागला. आज ग्रामीण भागांमध्ये सुद्धा प्लास्टिकच्या वस्तू पोहोचून ग्रामस्थांची आर्थिक परिस्थिती खालावत गेली आणि प्रदूषणाचा स्तर सुद्धा वाढू लागला.

 बांबूचे ग्रामीण भागांमध्ये ग्रामीण बांधवांचे आर्थिक स्तर उंचावण्यामध्ये योगदान होतेच. त्याचप्रमाणे प्रदूषणावर सुद्धा पर्यायाने पर्यायाने नियंत्रण होते याची जाणीव ठेवून केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय बांबू मिशन ची स्थापना केली व राज्यस्तरावर महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. याद्वारे चांगल्या बांबू प्रजातीच्या रोपांची लागवड खाजगी क्षेत्रामध्ये तसेच पडीत क्षेत्रामध्ये करण्याची योजना आखण्यात आली. तसेच बांबू संसाधनावर आधारित उद्योगाचे निर्मितीसाठी योजनासुद्धा करण्यात आली. National Bamboo Mission व Maharashtra Bamboo Development Board च्या संकेतस्थळावर सर्व योजनांची विस्तृत माहिती उपलब्ध होऊ शकते.

तरी जागतिक बांबू दिवसाच्या निमित्ताने जास्तीत जास्त बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर करून पर्यावरणाचे संरक्षण व प्रदूषण कमी करण्याबरोबर बांबू कारागिरांना त्यांच्या रोजगाराची हमी देण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी सर्वांनी निश्चय करावा,  असे आवाहन वृत्त समन्वयक ठाणे, वनवृत्त श्री.अजय पिलारी सेठ यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक