समाज कल्याण विभागाच्या योजनांची प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या वतीने जनजागृती कार्यक्रम संपन्न

 


 

अलिबाग,दि.23 (जिमाका):- रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग सुनील जाधव यांच्या पुढाकारातून  समाज कल्याण विभागच्या रमाई आवास घरकुल योजना, स्टॅंडप इंडिया मार्जिन मनी, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविणे, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणे योजना, वृद्धाश्रम योजना, कन्यादान योजना,  यांसह विविध योजनांची जनजागृती डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, अलिबाग येथे बहुसंख्य जनसमुदायाच्या उपस्थितीत करण्यात आली.

        यावेळी या कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. या कलापथकाचे नेतृत्व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी करीत असून कलाकार म्हणून विनोद नाईक, सुचित जावरे, यश पाटील, पार्थ म्हात्रे, साहिल म्हात्रे, दिशा पाटील, नेहा पाटील आदी सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी पथनाट्यात सहभागी सर्व कलाकारांचे कौतुक केले. तसेच शासकीय योजनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे देखील त्यांनी उपस्थितांना सांगितले.

       जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या या लोकजागराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक