किल्ले रायगड येथे 5 व 6 एप्रिल रोजी शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता शिवभक्तांनी मोठ्या संख्येने किल्ले रायगडावर उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन

 

 

अलिबाग,दि.24 (जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराज यांची दि.6 एप्रिल 2022 रोजी 343 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने किल्ले रायगड येथे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ व स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्या वतीने श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, महिला व बालविकास मंत्री श्री.मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख पाहुणे म्हणून त्याचबरोबर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे. तरी या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दि.5 व 6 एप्रिल 2023 रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-

बुधवार दि.5 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिर दीपवंदना,  रात्रौ 8.30 वाजता पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती (राजसभेत), रात्रौ 9.30 वाजता शाहिरी कार्यक्रम “ही रात्र शाहिरांची (राजसभेत), शाहिर किरणसिंग सुरज राऊळ जळगाव तसेच रात्रौ 10 वाजता श्री जगदिश्वर मंदिरात “हरिजागर”.

गुरुवार दि.6 एप्रिल 2023 पहाटे 5 वाजता श्री जगदिश्वर पूजा, सकाळी 6 वाजता श्री हनुमान जन्मोत्सव, सकाळी 8 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा, सकाळी 9 वाजता राजदरबार येथे श्री शिवप्रतिमा पूजन,सैन्यदल अधिकारी आणि सरदार घराणे सन्मान, गडरोहण स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन, प्रमुख पाहुणे यांचे मनोगत.

सकाळी 11 वाजता  श्री शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक राजदरबार ते श्री शिवसमाधी, सकाळी 11.30 वाजता श्री शिछत्रपतींना मानवंदना सर्व शिवभक्त व रायगड जिल्हा पोलीस, दुपारी 12 वाजता शिवभक्तांना होळीचा माळ येथे महाप्रसादाचे वितरण.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने मराठ्यांच्या समाधीस्थळांचे अभ्यासक श्री.प्रविण भोसले यांना श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार तर सैन्यदल अधिकारी ले.जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त)(PVSM,VSM,ADC), शूर सरदार हरजीराजे महाडीक यांचे वंशज यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

आतापर्यंत किल्ले रायगडावरील श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमात अनेक थोर व्यक्तींनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.

तरी छत्रपतींना आदरांजली वाहण्याकरिता या श्री शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमास शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघूजीराजे आंग्रे, सरकार्यवाहक पांडूरंग बलकवडे, कार्यवाह सुधीर थोरात आणि स्थानिक उत्सव समिती, महाडचे अध्यक्ष त्रिंबक पुरोहित, कार्यवाह संतोष कदम यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक