महाज्योतीच्या सीईटी/निट/जेईई 2025 प्रशिक्षणासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

                अलिबाग,दि.21(जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र संयुक्त प्रवेश परीक्षा (सीईटी)/जेईई/निट 2025 या परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर 31 मार्च 2023 पूर्वी अर्ज करावे, असे आवाहन महाज्योतीच्यावतीने करण्यात आले आहे.

महाज्योती मार्फत एमएचसीईटी/जेईई/निट या परीक्षांसाठीचे ऑनलाईन पद्धतीने पूर्व प्रशिक्षण देण्यात येते.  या प्रशिक्षणात सबंधित परीक्षेतील गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाच्या तज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणात सहभागी उमेदवारांना टॅब तसेच  त्यासाठी लागणारे इंटरनेटची (6 जीबी/प्रतिदिन) सुविधा तसेच परीक्षेसाठी लागणारे दर्जेदार अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येते.

या योजनेसाठी आवश्यक पात्रता पुढीलप्रमाणे आहे-- उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी, उमेदवार हा इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/असावी, उमेदवार हा नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा/ असावी, जे विद्यार्थी सन 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा देत आहेत, ते विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करतांना 10 वी चे प्रवेश पत्र व 9 वी ची गुणपत्रिका जोडावी, विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा. या बाबतची कागदपत्रे त्याने भविष्यात सुचनांनूसार अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी इयत्ता 9 वी ची गुणपत्रिका, 10 वीची गुणपत्रिका, ओळखपत्र, विद्यार्थ्यांने 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा पुरावा (बोनाफाईड प्रमाणपत्र), आधार कार्ड, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

या पूर्व प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या https://mahajyoti.org.in/.../application-for-mht-cet-jee.../ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्वाक्षांकीत करुन स्पष्ट दिसतील असे स्कॅन करुन अपलोड करावे, असे आवाहन महाज्योतीच्या प्रकल्प व्यवस्थापक श्वेता रहानगडाले यांनी केले आहे.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक