वन्यजीव बचाव आणि पर्यावरण विषयक भरीव कामगिरी करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न


 

अलिबाग,दि.21(जिमाका):- अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील वन्यजीव बचाव आणि त्याबद्दल प्रबोधन करीत असणाऱ्या गुणी कार्यकर्त्यांचा तसेच रायगड जिल्ह्यात कार्यरत वन्यजीव बचाव व समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या संस्थांचा सत्कार रविवार, दि.19 मार्च 2023 रोजी अलिबाग येथे करण्यात आला.

या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीव संरक्षक ॲड.अमित चव्हाण, प्रख्यात बालरोगतज्ञ आणि जेष्ठ पक्षी निरीक्षक डॉ.वैभव देशमुख, ज्येष्ठ सर्प अभ्यासक श्री.प्रदीप कुळकर्णी, अलिबाग मधील व्यावसायिक आणि प्राणीमित्र श्री.मंदार गडकरी आणि प्रख्यात व्यावसायिक मिलिंद कवळे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सेवा संकल्प प्रतिष्ठान ही संस्था अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यास वाहून घेतलेली संस्था आहे. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, युवा, महिला कल्याण, नागरी समस्या, ग्राहक संरक्षण, शेतकरी कल्याण अशा विविध 12 विभागांवर संस्थेचे भरीव कार्य अवघ्या महाराष्ट्रभर सुरू आहे. सेवा संकल्प प्रतिष्ठान (रजि) ही संस्था मुंबई मध्ये स्थित असून डॉ. कृष्णाजी दाभोळकर हे त्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत.  डॉ. प्रसाद दाभोळकर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून संस्थेचे काम पाहतात.

वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग ही संस्था अनेक वर्षांपासून वन्यजीव बचाव आणि त्यांच्यावर उपचाराचे काम करीत आहे तसेच निसर्गासोबत सहजीवन यासाठी प्रबोधनात्मक व्याख्याने आणि कार्यशाळा आयोजित करीत आहे. संस्थेत कार्यरत 36 सक्रिय कार्यकर्त्यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. पनवेल येथील नेचर फ्रेंड सोसायटी (NFS), उरण येथील फ्रेंड्स ऑफ नेचर (FON), अलिबाग मधील वाइल्ड लाईफ वॉरियर्स (WWA) आणि रोहा येथील ऑर्गनायझेशन फॉर वाइल्डलाइफ स्टडीज (OWLS) ह्या संस्थांचा देखील प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास सेवा संकल्प प्रतिष्ठान (रजि) संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कृष्णाजी दाभोळकर, सरचिटणीस श्री. विप्रदास परुळेकर, सचिव श्री. विवेक ठवाल, समिती सदस्या सौ. शुभांगी दाभोळकर, सेवा संकल्प प्रतिष्ठान रायगड जिल्हा अध्यक्ष डॉ. प्रसाद दाभोळकर, उपाध्यक्ष श्री. अशोक साष्टे, सरचिटणीस श्री. संदेश थळे आणि समिती सदस्या सौ. श्रृती दाभोळकर, श्री. नारायण भट, श्री. अरुणकुमार तिवारी, श्री. विजय महिमकर आदि मान्यवर उपस्थित होते.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक