केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते संपन्न होणार राष्ट्रीय महामार्ग क्र.66 आणि 965 च्या काँक्रिटीकरणाचा भूमीपूजन सोहळा

 

 

        अलिबाग,दि.29(जिमाका):-कोकणासाठी महत्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र.66 मुंबई ते गोवा या महामार्गावरील पनवेल ते कासू , राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (राजेवाडी फाटा ते वरंध गाव) तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र.965 डीडी (वरंध गाव ते पुणे जिल्हा हद्द) या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह दुपदरीकरण करणे, अशा एकूण 63.900 किलोमीटर लांबी व एकूण 414.68 कोटी मूल्य असलेल्या या तीन प्रकल्पांचा भूमीपूजन सोहळा कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझाजवळ, खारपाड गाव, ता.पनवेल येथे गुरुवार, दि.30 मार्च 2023 रोजी  सकाळी 8.30  वाजता संपन्न होणार आहे.

             या भूमीपूजन सोहळा कार्यक्रमासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री ना.श्री.रविंद्र चव्हाण, राज्यसभा सदस्य खासदार श्री.कुमार केतकर, लोकसभा सदस्य, मावळ खासदार श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य, रायगड खासदार श्री.सुनिल तटकरे, विधानपरिषद सदस्य, सर्वश्री आमदार श्री.निरंजन डावखरे,  श्री.अनिकेत तटकरे, श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य सर्वश्री आमदार श्री.भरत गोगावले, श्री.प्रशांत ठाकूर, श्री.रविंद्र पाटील, श्रीमती आदिती तटकरे, श्री.महेंद्र थोरवे, श्री.महेश बालदी, श्री.महेंद्र दळवी यांची उपस्थिती राहणार आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक