जिल्ह्यात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता व विद्यार्थिनींकरिता शासकीय वसतिगृहे सुरू होणार


 

अलिबाग,दि. 29(जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उघडणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व  विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता 01 व विद्यार्थिनींकरिता 01 अशी एकूण 02 शासकीय वसतिगृहे सुरू करावयाची आहेत.

             इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि.29  नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये प्रति जिल्हा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुलांकरिता एक व मुलींकरिता एक अशी दोन १०० क्षमतेची नवीन शासकीय वसतिगृहे नोंदणीकृत संस्थामार्फत चालविण्याकरिता मंजूरी देण्यात आली आहे. इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि. 28 फेब्रुवारी 2023 अन्वये ही वसतिगृहे शासनामार्फत कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

               यात प्रवेश घेण्याऱ्या प्रवेशितांस भोजन, निवास व इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रवेशिताना ॲप्रन वैद्यकीय इ. साहित्य,अभियांत्रिकी प्रवेशितांकरिता ब्रॉयलर सूट, गणवेश, प्रकल्प भत्ता, स्नेहसंमलेन क्रीडा स्पर्धा इ. अनेक सुविधा शासनामार्फत देय आहेत.

              याकरिता विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गाचा असावा, अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला व सन 2022-23 मधील उत्पन्नाचा दाखला, आधार संलग्न बँक खाते इत्यादी दाखले जोडणे आवश्यक आहे.

                तरी इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी  व प्रवेशाकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांचे कार्यालय, कच्छीभवन, नेमिनाथ मंदिर, सेंट मेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त  सुनिल जाधव यांनी केले आहे.

000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक