वसतिगृहाकरिता भाडेतत्वावरील इमारतीत जागा मिळण्याकरिता इमारत मालकांनी संपर्क साधावा

 

 

अलिबाग,दि. 29(जिमाका):- सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात उघडणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व  विशेष मागास प्रवर्ग विद्यार्थ्यांकरिता 01 व विद्यार्थिनींकरिता 01 अशी एकूण 02 शासकीय वसतिगृहे सुरू करावयाची आहेत.

             इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि.29 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये प्रति जिल्हा इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील मुलांकरिता एक व मुलींकरिता एक अशी दोन १०० क्षमतेची नवीन शासकीय वसतिगृहे नोंदणीकृत संस्थामार्फत चालविण्याकरिता मंजूरी देण्यात आली आहे. इतर मागास, बहुजन कल्याण विभागाच्या दि.28 फेब्रुवारी 2023 अन्वये ही वसतिगृहे शासनामार्फत कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

    तसेच प्रत्येकी 100 क्षमतेची 02 वसतिगृहे जिल्ह्याच्या ठिकाणी अलिबाग येथे इतर मागास प्रवर्गातील मुले व मुलींच्या वसतिगृहाकरिता भाडेतत्वावरील इमारतीत चालवावयाची आहेत.   

                या इमारती शाळा, महाविद्यालयाच्या जवळ असाव्यात व मुलींकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सुयोग्य असाव्यात.

              इच्छुक इमारत मालकाने रू.500/- बंधपत्रावर मालकाचे इमारत भाड्याने देण्याबाबत संमतीपत्र, इमारतीचा तपशिल, खोल्या, स्वच्छतागृह, वीजेची, पाण्याची व्यवस्था आदी बाबी नमूद कराव्यात.

              तरी इमारत मालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, रायगड यांचे कार्यालय, कच्छीभवन,नेमिनाथ जैन मंदिर, सेंट मेरी स्कूलसमोर, श्रीबाग रोड, अलिबाग येथे संपर्क साधावा,असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक