स्वदेस फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने माहिती सादर करावी



अलिबाग,दि.30(जिमाका):- रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्यावतीने  रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून सुरू आहेत. स्वदेस फाऊंडेशन मार्फत दरवर्षी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. आतापर्यंत हजारो गरीब व होतकरू विद्यार्थ्यांनी स्वदेस शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन आपले अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून चांगल्या प्रकारची नोकरी मिळविली आहे.

 शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी पात्रता-अटी :-विद्यार्थी हा रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यातील रहिवासी असावा. कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 8.5 लाखाचे आत असावे, 12 वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत 60 टक्के पेक्षा जास्त टक्केवारी असावी, विद्यार्थ्याची उच्च शिक्षण घेण्याची महत्वकांक्षा असावी.

शिष्यवृत्ती निवड प्रक्रिया :-विद्यार्थ्यांने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वदेस फाउंडेशनने दिलेल्या क्यूआरकोड स्कॅन  करून आपली माहिती भरून दि.15 एप्रिल 2023 पूर्वी  पाठवावी,  त्यानंतर स्वदेस फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्याच्या दोन मुलाखती घेतल्या जातील,  मुलाखतीत पास झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली जाईल.

 शिष्यवृत्तीचे स्वरूप :- शिष्यवृत्ती विद्यार्थ्याचे उच्चशिक्षण पूर्ण होईपर्यंत दिली जाईल. प्रत्येक वर्षी दोन हप्त्यांमध्ये  ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्याला दिली जाईल. शिष्यवृत्ती रक्कम ही विद्यार्थ्याचे बँक खात्यात जमा केली जाईल. शिष्यवृत्ती ची रक्कम ही विद्यार्थ्याच्या वार्षिक उत्पना नुसार, त्याच्या कॉलेज फी आणि वसतिगृह खर्च याच्या 25, 40, 50, 60, 75 टक्के रक्कम दिली जाईल.

12 वी नंतर विद्यार्थ्यांना पुढील उच्चशिक्षण कोर्सेसला शिष्यवृत्ती दिली जाईल. वैद्यकीय क्षेत्र-बी.ए.एम.एस, एम.बी.बी.एस., बी.डी.एस., नर्सिंग, फार्मसी वाणिज्य क्षेत्र-सी.ए., सी.एस, बी.कॉम.इन अकाउंटन्सी, अभियांत्रिकी क्षेत्र-पदवी पदविका व आर्किटेक्चर, कायदा क्षेत्र-एल.एल.बी., हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर उच्च शिक्षण घेण्यासाठी पात्रता परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा, यूपीएससी, सैन्यदल व पोलीस पात्रता परीक्षा यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती देण्यात येते.

अधिक माहितीसाठी स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक बाळासाहेब माने मो.9422495053 व विनोद पाटील, मो.8379966767 यांना संपर्क करावा,असे आवाहन स्वदेस फाऊंडेशनच्या शिक्षण विभाग प्रमुख नीता हरमलकर यांनी केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक