कृषी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक


कृषी यांत्रिकीकरण योजना ही कृषी विभागाची एक महत्वपूर्ण योजना आहे. कृषी विषयक यांत्रिकीकरणाची मदत ही या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. या योजनेविषयी जाणून घेऊ या लेखातून…

या योजनेसाठी सर्व खातेदार शेतकरी, शेतकरी गट, एफपीओ, सहकारी संस्था पात्र लाभार्थी  असतात.  यासाठी 7/12 व 8 अ, आधारकार्ड छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याचा पासबुकच्या प्रथम पानाची प्रत व संवर्ग प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असणार आहेत.

यामध्ये समाविष्ट बाबी- कृषी यांत्रिकीकरण या घटकांतर्गत ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित यंत्र व औजारे, ट्रॅक्टर व पावर टिलर चलित यंत्र व औजारे, पीक संरक्षण साधने, मनुष्य व बैल चलित औजारे, प्रक्रिया युनिटस भाडे तत्वावर कृषी यंत्र व औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (औजारे बँक) यांचा समावेश असणार आहे. यात अनुदानाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्प, अत्यल्प, भूधारक शेतकरी व महिलांना ट्रॅक्टरसाठी 1.25 लाख व इतर बाबींसाठी 50 टक्के औजारे अशी मदत मिळणार आहे.

इतर लाभार्थ्यांना ट्रॅक्टरसाठी 1 लाख तर इतर औजारेसाठी 40 टक्के किंवा मंजूर कमाल अनुदान मर्यादा यापैकी कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे. औजारे बँक या घटकांतर्गत समाविष्ट बाबींमध्ये ट्रॅकर आणि इतर पसंतीनुसार औजारे यांचा समावेश असणार आहे. 10 लाखापर्यंत अनुदान 40 टक्के (चार लाख), 25 लाखापर्यंत 40 टक्के अनुदान (10 लाख) असणार आहे.

या योजनेच्या  अधिक माहितीसाठी mahadbtmahait.gov.in  हे संकेतस्थळ तसेच तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

 

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी,

रायगड-अलिबाग

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक