पनवेल येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 

रायगड(जिमाका) दि.27:-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग यांच्यामार्फत जिल्ह्यातील महिला व युवांकरिता शुक्रवार, दि.12 जुलै,2024 रोजी सकाळी 10.00 ते 4.00 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती  कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.

 जिल्ह्यातील सन 2024-25 या अर्थिक वर्षातील पहिल्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील कंपन्यांनी स्किल्ड व अनस्किल्ड जास्तीत जास्त रिक्तपदे या कार्यालयास कळविण्यात यावीत. शासनाच्या माध्यमातून खाजगी कंपन्यातील जास्तीत-जास्त रिक्तपदे रोजगार मेळाव्यातून भरती करण्यात येणार आहे. याकरिता या विभागाचे संकेतस्थळावर https://rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी केलेल्या आस्थापनांनी प्रथम आपल्याकडे हवे असलेले कुशल/अकुशल मनुष्यबळाची माहिती भरावी.  ही  माहिती भरताना प्रथम उपरोक्त संकेतस्थळावर Employment-Employer (List a Job)-Employer Login या क्रमाने जाऊन आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपल्या आस्थापनेची माहिती पहावीत्यातील  PanditDindayalUpadhyay Job Fair  या ऑप्शनमधून दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपल्या जिल्ह्याच्या नावावरील View Details-Job Details-Agree and Post Vacancy-Add New Vacancy ऑप्शनवर क्लीक केल्यानंतर रिक्तपदांची माहिती भरुन शेवटच्या पानावरील  Save Vacancy वर क्लीक करावेत्याचप्रमाणे ज्या आस्थापनांची यापूर्वी उपरोक्त संकेतस्थळावर नोंदणी करण्यात आलेली नाही त्यांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment-Employer (List a Job)-Register     या क्रमाने जाऊन नवीन नोंदणी करावी व आपल्या आस्थापनेची नवीन नोंदणी केल्यानंतर आपल्याकडील रिक्तपदे अधिसूचित करुन संकेतस्थळावर दि.09 जुलै 2024 पर्यंत नोटीफाइड करावीत.

संकेतस्थळावर नवीन नोंदणी करणे व रिक्तपदे अधिसूचित करणे या संदर्भात आपणास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांच्या 9421613757 या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड