वाहन भाडे,कंत्राटी तत्त्वावर पुरविण्यासाठी इच्छूकांनी दरपत्रके सादर करावीत


 

रायगड(जिमाका)दि.27:-जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकत्ता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग या शासकीय कार्यालयासाठी सन-2024-25 या अर्थिक वर्षाकरिता वाहन भाडे/कंत्राटी तत्त्वावर (On Calling) पुरवठा करण्याकरिता दरपत्रके मागविण्यात येत असून इच्छूक वाहन पुरवठादारांनी दरपत्रके खालील नमुन्यात सिलबंद लखोट्यात दि.01 जुलै 2024 पर्यंत सादर करावीत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

विहित नमुना-वाहनाचा तपशिल ( कंपनी मेक व मॉडेल ), वाहन दर प्रति कि.मी. सर्व करासहित-ए.सी, नॉनए.सी, लोकल 8 तासाचे भाडे सर्व करासहित- किमान 150 कि.मी., अतिरिक्त प्रति कि.मी. दर, 24 तासाचे सर्व करासहित- किमान 300 कि.मी, अतिरिक्त प्रति कि.मी. दर.

(सूचना–नमूद करावयाच्या माहीतीमध्ये खाडाखोड करु नये केल्यास सदरचे दरपत्रक रद्द ठरविले जाईल), कार्यालयाचा पत्ता-जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग, वैभव निवासभंडार आळी,चेंढरे अलिबाग.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड