जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी आधार व मोबाईल सिडिंग करणे अनिवार्य --जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे

 

 

रायगड,(जिमाका)दि.26:- सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना धान्य वितरण करण्यात येते. योजनेत एकूण 17 लाख 69 हजार 776 लाभार्थी आहेत. या लाभार्थीचे आधार प्रमाणीकरण (e-kyc) व Mobile Seeding करण्याच्या शासन सूचना आहेत. रेशनकार्डसोबत आधार जोडणी करताना लाभ घेणारी व्यक्ती तीच आहे किंवा कसे याची पडताळणी होणार आहे. याकरिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष जाऊन अंगठ्याचा ठसा देऊन तसेच कुटूंबातील व्यक्तींचे मोबाईल क्रमांक देऊन आधार प्रमाणिकरण (e-kyc) व Mobile Seeding करावयाचे आहे. त्याचप्रमाणे ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप आपले आधारकार्ड शिधापत्रिकेस जोडलेले नाही अशा शिधापत्रिकाधारकांनीही आपले आधारकार्ड शिधापत्रिकेस संलग्न (Aadhar Seeding) करावयाचे आहे. यामुळे रेशनिंगची गळती थांबण्यासह बोगस लाभार्थीना चाप बसणार आहे. यासंदर्भात सर्व लाभार्थी व स्वस्तधान्य दुकानदार यांना 100 टक्के कामकाज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांनी केले आहे.

केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत / असंघटीत यांनाही मिळणार शिधापत्रिकेचा लाभ. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये केंद्र शासनाच्या ईश्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, जे अद्याप रेशनकार्ड डेटावर नोंदणीकृत नाहीत, अशा स्थलांतरीतांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या ईश्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, जे अद्याप रेशनकार्ड डेटावर नोंदणीकृत नाहीत, अशा स्थलांतरीतांना शिधापत्रिका वितरीत करण्याबाबतच्या शासन सूचना आहेत.

ई-श्रम पोर्टलवरील रेशनकार्ड डेटावर नोंदणीकृत असलेल्या मात्र शिधापत्रिका नसलेल्या रायगड जिल्हयातील 40 हजार 902 स्थलांतरीत कामगारांचा डेटा शासनाकडून उपलब्ध झालेला आहे. त्यानुसार ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरीत कामगारांना उत्पन्नानुसार शिधापत्रिका देण्याची कार्यवाही जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये सुरु आहे. त्यानुसार ज्या व्यक्तींनी स्वतःचे नांव ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे; मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ घेतलेला नाही अशा व्यक्तीनी आवश्यक त्या कागदपत्रांसह जवळच्या तहसिल कार्यालयामध्ये जाऊन शिधापत्रिकेचा लाभ घ्यावा.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड