महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग रायगड जिल्हा दौऱ्यावर

 

 

रायगड, (जिमाका) दि.27:--महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग जिल्हा दौऱ्यावर येत असून 28 व 29 जून 2024 या दोन दिवसात जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देणार आहेत, असे आयोगाचे सचिव नितीन पाटील यांनी कळविले आहे.

या दौऱ्यात 28 जून रोजी  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय , जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी भेट देतील तसेच वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांबरोबर मानव अधिकार संरक्षण संदर्भात आढावा घेणार आहेत. तसेच कर्नाळा येथील युसुफ मेहर अली सेंटर येथे भेट देऊन स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी बरोबर चर्चा करतील. पाली येथील आदिवासी कातकरी यांच्यासाठी विकास कामाबाबत माहिती घेतील. दिनांक 29 जून रोजी माणगाव येथे भेट देऊन माणगाव व म्हसळा येथील तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी बरोबर चर्चा करून आढावा घेतील. माणगाव येथे आदिवासी कातकरी यांच्या विकासाबाबत माहिती घेतील.  तसेच आदिवासी नागरिकांसाठी आधार कार्ड मधील दुरुस्त्या व अद्ययावत करणेच्या मोहीमेतील कार्यवाहीबाबत जाणून घेणार आहेत.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड