जिल्हा सामान्य रुग्णालयास देण्यात आलेल्या आरओयुनिट हस्तांतरण सोहळा संपन्न

 


          

रायगड(जिमाका)दि.2:- OWENS CORNING  व UNITEDWAY  या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून  जिल्हा सामान्य रुग्णालयास  देण्यात आलेल्या आर ओ युनिट चा हस्तांतरण  सोहळा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. डॉ.मनीषा विखे तसेच OWENS CORNING व UNITED WAY तर्फे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये  संपन्न झाला. 

  यावेळी   अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी (घुगे), OWENS CORNING चे (Director HR INDIA)  संजय राव,  (Supply Chain Leader) अभिषेक रघुवंशी, (Occupational Physician), डॉ.भालचंद्र पेंढाबकर, (CSR Program Co.Ordinator) धर्मराज प्रधान  तसेच UNITEDWAY  MUMBAI  या संस्थेचे (VP. CommunityInvestment), अनिल परमार,  (VP Co.Operate Partnership) प्राची नौटियाल, (SeniorManager Community Investment)डॉ.शैलेश वागळे, (Executive) डॉ.अदिल व इतर अधिकारी, (प्रभारी अधिसेवीका) श्रीम.अनिता भोपी, सर्व वॉर्डच्या इन्चार्ज सिस्टर उपस्थित होत्या.  

              कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा डॉ.भरत बास्टेवाड  म्हणाले की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबादास देवमाने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे   व त्यांच्या सक्रीय टीममुळे जिल्हा रुग्णालयाचा कायापालट होत आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमाकरिता नेहमीच सहकार्य राहील,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच  OWENSCORNING  व  UNITED WAY या सामाजिक संस्थेने जिल्हा सामान्य रुग्णालयास एक R.O.PLANT  (1000कॅपॅसिटी)चा व एक  पोर्टेबल R.O.PLANT  असे दोन  R.O.PLANT हस्तांतरित केले असल्यामुळे त्यांनी त्यांचे कौतुक केले.  तसेच  रायगड जिल्ह्यातील इतर कंपन्यांनी त्यांच्या सीएसआर फंडातून आरोग्य विभागास  सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

        जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अंबादास देवमाने म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड  हे रुजू झाल्यापासून सातत्याने आरोग्य विभागाचे काम उंचावण्यासाठी पाठीशी असतात. त्यांच्यामार्फत नियमितपणे आरोग्य विभागातील विविध योजनांचा आढावा  घेतला जातो. अडीअडचणी जाणून घेऊन आवश्यक त्या बाबींची पूर्तता जिल्हा स्तरावरून, शासन स्तरावरून अथवा विविध अशासकीय संस्थांमार्फत करण्यासाठी नेहमीच त्यांचे सहकार्य लाभते.

जिल्हा रुग्णालयरायगड अलिबाग येथे सन 2009 पासून डायलेसिस  युनिट  कार्यान्वित  असून सद्य:स्थितीत डायलेसिस युनिटमध्ये 10 डायलेसिस मशीन कार्यान्वित आहेत. प्रत्येक वर्षी सुमारे 500 ते 600 रुग्ण डायलेसिस उपचार घेत आहेत. परंतु या  ठिकाणी कार्यान्वित असलेले  R.O.PLANT कमी क्षमतेचे व फार जूने झाले होते.  त्यामुळे दररोज रुग्णांना दर्जेदार डायलेसिस सेवा देताना अडचणी निर्माण होत होत्या. ही बाब  लक्षात घेवून  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड  यांच्या प्रयत्नांमुळे OWENS CORNING व UNITED WAY  या  संस्थेकडून जिल्हा रुग्णालय अलिबागकरिता एक R.O.PLANT  (1000 कॅपॅसिटी) चा व एक  पोर्टेबल R.O.PLANT मिळाले आहेत. 

     या कार्यक्रमाच्या वेळी  मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.भरत बास्टेवाड  यांनी सर्वप्रथम R .O. PLANT उपलब्ध करून दिलेल्या संस्थेचे अधिकारी यांचे कौतुक करुन त्यांना सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. 

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक