शुद्ध व स्वच्छ पाणी पुरवठयांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा संपन्न



रायगड (जिमाका) दि. 1:- जनतेला शुद्ध व स्वच्छ पाणी नियमित व पुरेशा प्रमाणात देण्यासाठी ग्रामपंचायतींनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी तसेच गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठयासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले.

जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी राज्य पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ.शैलेश कानडे, रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे,प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र भालेराव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व  बालकल्याण निर्मला कुचीक, जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद चौधरी,मुख्य लेखा व वित्त अधिकारी  श्री.राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ बास्टेवाड यांनी ग्रामपंचायत स्तरांवरील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता चांगली ठेवणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.त्याचबरोबर घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत असे सांगितले.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी पाणी गुणवत्ता,रासायनिक व जैविक तपासणी विहीत वेळेत पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या.

राज्य पाणी गुणवत्ता सल्लागार डॉ.शैलेश कानडे यांनी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण मार्गदर्शक सूचना, जलसुरक्षकाचा शासन निर्णय, FTK तपासणी बाबतचा शासन निर्णय, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंमलबजावणीचा शासन निर्णय इ बाबींवर  उपस्थितांना मागदर्शन केले.यावेळी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) कार्यक्रमांतर्गत जिल्हयांतील तळा,कर्जत व खालापूर हे तीन तालुके हागणदारीमुक्त अधिक झाले आहेत.या तीन तालुक्यांच्या गट विकास अधिका-यांचा  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.

 कार्यशाळेला गट विकास अधिकारी, उपअभियंता (ग्रापापु),तालुकाआरोग्य अधिकारी,बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ व सल्लागार उपस्थित होते.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक