अमृत'च्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा--- मुख्य वित्त व लेखाधिकारी महेश वाकचौरे पेण, खोपोली येथे लाभार्थी संवाद मेळावा व मार्गदर्शन

 '

 

रायगड,दि.30 (जिमाका):-  जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे. या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन 'अमृत'चे मुख्य वित्त व लेखाधिकारी तथा जिल्ह्याचे पालक अधिकारी महेश वाकचौरे यांनी लाभार्थी संवाद मेळाव्या दरम्यान केले.

श्री वाकचौरे यांनी सांगितले, की महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील परंतु ज्या अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांना शासनाच्या इतर कोणत्याही आयोग, महामंडळ, संस्था यांच्याकडून लाभ मिळत नाही, अशा अर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी 'अमृत' (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी, पुणे) या संस्थेची राज्य सरकारने स्थापना केली आहे.

 'अमृत'च्या विविध योजनांचा प्रसार, प्रचार करणे व लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक येथे घेण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेवारांना अर्थसहाय्य देणे, संघ लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी निवड केलेल्या उमेदवारांना अर्थसहाय्य देणे, अर्थिक विकासाकरिता प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबवून स्वावलंबी बनविणे, याचबरोबर कृषी उत्पन्न आधारित लघुउद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण देणे, कौशल्यविकास प्रशिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वय साधने इत्यादी योजना 'अमृत'मार्फत रबिवल्या जात आहेत, असे वाकचौरे यांनी याप्रसंगी सांगून, या योजनांची सविस्तर माहिती दिली. यासाठी 'अमृत'चे संकेतस्थळ www.mahaamrut.org.in या वर सर्व माहिती व विविध योजनांचे अर्ज दिलेले असून, या संकेतस्थळाला भेट देण्याचे तसेच 'अमृत'च्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्याचे वाकचौरे यांनी यावेळी आवाहन केले.  

महेश वाकचौरे यांनी पेण, खालापूर तालुक्यातील खोपोली आदी भागांचा दौरा करून लाभार्थी व विविध मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन 'अमृत' योजनांची माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासोबत रायगड जिल्हा समन्वयक शैलेश विनायक मराठे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. श्री.मराठे यांनीही उपस्थितांना विविध योजनांबाबत प्रबोधित केले. विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सदर बैठकीत उपस्थिती दर्शवित 'अमृत'च्या योजनांच्या प्रसारासाठी आपले योगदान देण्याची ग्वाही दिली.

००००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक