महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड


रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील खार जमीन संशोधन केंद्र हे महाराष्ट्र राज्यामध्ये क्षार जमीनीवर संशोधन करणारे एकमेव संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राची स्थापना 1943 मध्ये कृषि संशोधन केंद्र म्हणून झाली नंतर आवश्यक असणारे शास्त्रज्ञ व इतर मनुष्यबळ पुरविण्यात आल्यानंतर 1959 मध्ये कृषि संशेाधन केंद्राचे नामकरण खार जमीन संशोधन केंद्र असे करण्यात आले. यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि सुविधा राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प या योजनेतून अंशत: योजना-1 आणि योजना-1 यामधून पुरविण्यात आल्या. या केंद्राचे कार्यक्षेत्र पनवेल आणि पारगांव या दोन प्रक्षेत्रामध्ये विभागण्यात आले आहे. पनवेल प्रक्षेत्राचे क्षेत्रफळ 12.8.2016 हेक्टर आणि पारगांव प्रक्षेत्राचे क्षेत्रफळ20.24 हेक्टर इतके आहे.   
पनवेल व पारगांव हि प्रक्षेत्र कोकणातील रायगड जिल्ह्यातील असून येथे सरासरी पाऊस 2500 ते 3000 मि.मि. पडतो.सरासरी कमाल 33 ते 38 सें.ग्रे. आणि किमान 24.5 ते 29.0 तापमान सें.ग्रे. एवढे असते. तसेच आद्रता 79ते 96 %एवढी असते.
कोकणातील चार जिल्ह्यात अंदाजे 65.485 हे.इतके क्षेत्रफळ खार जमिनीखाली आहे. त्यापैकी 85टक्के ठाणे,रायगड व 15% रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते. सर्वसाधारणपणे खार जमिनीमध्ये क्षारतेचे प्रमाण जास्त् असते. तसेच गोड्या पाण्याचा अभाव यामुळे या जमीनीमध्ये पावसाळ्यात भात हे मुख्य पिक घेतले जाते. त्याचे उत्पन्न् सरासरी भाताच्या उत्पन्नापेक्षा कमी होऊ शकते. ते वाढविण्यासाठी सुधारीत पद्धतीचा अवलंब, खार जमीनीची सुधारणा आणि क्षारता सहन करणाऱ्या भाताच्या वाणांचा उपयोग करावा.
संशोधन केंद्रांची उद्दीष्ट्ये –
जमिनीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी या संशोधन केंद्राला खालील उद्दीष्टे देण्यात आली आहेत.
भाताच्या लागवडीसाठी नविन तंत्रज्ञान विकसीत करणे.,खार जमीनीचे व्यवस्थापन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करणे.,क्षार प्रतिकारक भात जातींचा विकास करणे.क्षार प्रतिकारक विकसीत भात जातींची उपयोगीता तपासणे., खार जमिनीची सुधारणा होण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत करणे.,पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे., क्षार प्रतिकारक भात जातींचे विजोत्पादन करणे.,खार जमिनींसाठी किड नियंत्रणासाठी उपयोगात येणाऱ्या वाणांचे तंत्रज्ञान विकसीत करणे.,जिताडा व भारतीय प्रमुख कार्प माशांचे संवर्धन करणे.,एकात्मिक मत्स्य पालन विषयक प्रकल्प राबविणे., पिंजऱ्यात जिताडा माशाचे संवर्धन प्रकल्प राबविणे., मत्स्य् बिजांचा पुरवठा करणे., एम रोझनबरगी कोळंबींची वाढ व उत्पादन तपासणे.,नवीन तंत्रज्ञानाचा प्रयोग शाळेतून शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करणे.मत्स्य व कृषी विषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे., आखिल भारतीय समन्वित क्षारयुक्त जमिनी आणि खारवट पाण्याचा शेतीसाठी वापर हा भारतीय कृषी अनुसंधान परिषद पुरस्कृत प्रकल्प राबविणे.
खार जमिन संशोधन केंद्राने केलेल्या ठळक शिफारसी आणि निष्कर्ष- भरतीचे पाणी बाह्यकाठ्यातून जमीनीमध्ये येवू नये म्हणून खाडीच्या बाजूने 2:1 प्रमाणात उतारे ठेवून दगडांचे पिचिंग करावे आणि जमीनीच्या बाजूने 1:1उतार ठेवावा. शुल,मारवेल आणि लोणकट इत्यादी गवताचे अच्छादन ठेवावे.क्षारांचा निचरा होण्यासाठी 100 मीटर अंतरावर 1.5 ते 2 मी.खोलीचे चर किफायतीशीर ठरतात व क्षारता कमी होते.,खार जमिनीसाठी उलकटणी, विंधणे,चाळी,नांगरट करणे यामुळे क्षारांचे प्रमाण कमी होते.,
खार जमीनीत खालील भातलागवड पद्धती विकसीत केल्या.
पुर्नलागवड,आवटणी, रहू पद्धत.
क्षार प्रतिकारक भात जातींचा विकास व प्रसारण. (पनवेल-1,पनवेल-2,पनवेल-3)
भुपृष्टीय तळ्यांमुळे जमीनीची क्षारता कमी झाल्याचे आढळले.,रब्बी हंगामातील पीक व्यवस्थापन-मुळा,पालक,टोमॅटो,मोहरी इत्यादी भाजीपाला पिके सिंचनाच्या कमी पाळ्या देऊन घेता येतात., कंपोस्ट,हिरवळीचे खत,शेणखत,इत्यादी सेंद्रीय खतांचा वापर करुन भाताचे उत्पन्न वाढते व क्षारतेत घट आढळते.,खार जमिनीचे व्यवस्थापन, नत्राचा वापर, युरिया-डिएपी गोळ्यांचा वापर केल्यास भाताच्या उत्पन्नात वाढ आढळली.,गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धन किफायतीशीर होते., भात पिकाबरोबर मत्स्य संवर्धन फायद्याचे होते.रोहू, कटला,  जिताडा,तिलापिया या माशांचे संवर्धन करुन उत्पन्न वाढविता येते.,मत्स्य बीज संगोपन व विक्री हा कमी वेळेत अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय आहे.,कुक्कुटपालन,बटेर पालन यांचा मत्स्य संवर्धनात वापर करुन अधिक उत्पन्न मिळविता येते., खेकडा  संवर्धन करुन किफायतीशीर उत्पन्न मिळविता येते., शेततळ्यांच्या बांधावर नारळ, भाजीपाला यांची लागवड करुन उत्पन्न वाढविता येते.
अधिक माहितीसाठी संपर्कः- खार जमिन संशोधन केंद्र, बंदर रोड,पनवेल-रायगड पिनकोड 410206 दूरध्वनी क्र.022-27452775.
-संकलनः जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग

०००००

Comments

  1. I was trying to call on 022-27452775, but no one was receiving a call.
    I want to do enquiry for crab farming.
    Please call me on
    9870124949
    Prasad Bhurke

    ReplyDelete
    Replies
    1. tumchyakde no aahe ka tikadacha asle tar please share kara na

      Delete
  2. मला खेकडा बिज मिळेल का

    ReplyDelete
  3. I called lots of time on landline but no response

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक