'रक्तदान: करुन पहा… छान वाटतं'


मानवाने आपल्या बुध्दीच्या जोरावर विज्ञानाद्वारे अनेक नवनविन प्रयोग केले.अनेक असाध्य गोष्टी साध्य करुन नेहमीच प्रगती करत आहे. मानवास आजतागायत रक्ताला पर्याय शोधता आला नाही. विज्ञानाने बरेंच प्रयत्न केले पण आपण कृत्रिम रक्ताची निर्मिती करु शकलो नाही. हे एक सत्य असून जगातील वैज्ञानिकांना सतत आवाहन देत राहिल. आज मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नसल्यामुळे माणसाचा जीव वाचविण्यासाठी रक्ताचीच आवश्यकता असते. यासाठी 'रक्तदान ' हाच एकमेव उपाय आहे. त्यासंदर्भात जनजागृती व्हावी, लोकांना रक्तदानाचे महत्त्व पटावे यासाठी  राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस (दि.1 ऑक्टोबर) निमित्त हा विशेष लेख.
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस सर्वप्रथम 1 ऑक्टोंबर 1975 साली Indial society of Blood transfusion and immunohaematology द्वारे व्यक्तीच्या जीवनात रक्ताची आवश्यकता आणि रक्ताचे महत्व यासाठी साजरा करण्यात आला. Indial society of Blood transfusion and immunohaematology ची स्थापना 22 ऑक्टोबर 1971 साली डॉ.जे.जी.ज्वाली आणि श्रीमती के.स्वरुप, क्रिसेन संस्थेचे संस्थापक सदस्य यांच्या नेतृत्वात झाली.
आपल्या भारतीय संस्कृतीत दान या शब्दाला खूप महत्व आहे. रक्तदान करतांना आपण कोणासाठी, कोणत्या कारणासाठी रक्तदान करतो,हे रक्तदात्यास माहित नसते. पण आपल्या रक्तदानाने कुणाचा तरी जीव वाचेल या सामाजिक व राष्ट्रीय भावनेसाठी रक्तदाता रक्तदान करीत असतो. स्वैच्छिक रक्तदान म्हणजे स्वत:हून केलेले रक्तदान . रक्त हे कुठल्याही प्रयोगशाळेत अथवा कृत्रिमरित्या तयार करता येत नाही. तर ते तयार होते तुमच्या आमच्या मानवी शरीरात. प्राण्यांचे रक्त माणसाला चालत नाही म्हणूनच माणसाचा जीव वाचविण्यासाठी माणसाचेच रक्त दिले जाते. म्हणूनच रक्तदान महत्वाचे आहे. यासाठी प्रत्येक सुजाण नागरिकाने रक्तदान ही सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मका म्हणून रक्तदानासाठी शासन मान्यता प्राप्त रक्तपेढीत व रक्तदान शिबीरात रक्तदान महत्वाचे ठरते.
रक्तदानाचे महत्त्व रुजावे यासाठी या वर्षीचे शासनाचे घोष वाक्य..
 रक्तदान ........ करुन पहा.........  छान वाटते !!
अपघात, शस्त्रकिया, प्रसुती, ऍनेमिया (पंडूरोग), हिमोफिलीया, थॅलसेमिया, सिकलसेल, कर्करोग, एड्स, इ.विविध आजारांच्या रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज असते. ते रक्त कोण्या व्यक्तीकडूनच घ्यावे लागते आणि हया गोष्टींचा थेट सबंध त्या व्यक्तीच्या जीवन मरणाशी असतो म्हणूनच रक्तदानाला महत्व असून रक्तदान हे महान दान आहे. रक्तामुळे रुग्णांचा प्राण वाचतो म्हणून जीवनदान आहे.
रक्तदानाविषयी :-
रक्तदान करते वेळी रक्तदात्याचे वय 18 ते 60 वर्षे, वजन 45 किलो वर, रक्तदाब नियमित, हिमोग्लोबीन प्रमाण 12.5 ग्रॅम : वर असले पाहिजे.,शरीरात 5 ते 6 लिटर रक्त असते त्यापैकी 350ml450 ml रक्त घेतले जाते. शरीराच्या वजनाच्या 7% असते., रक्ताची संपूर्ण चाचणी (एच.आय.व्ही. हिपॅटॉयटीस बी, हिपॅटॉयटीस सी, व्ही.डी.आर.एल. मलेरिया, क्रॉसमॅच रक्तगट इ.) करुनच रक्तपुरवठा रुग्णास केला जातो.,रक्तगट A,B,AB, Oव RH फॅक्टर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असून O रक्तगट सर्वांना चालतो म्हणून युनिव्हर्सल डोनर (डोनर) म्हणतात. तर AB रक्तगटाला सर्व रक्तगट चालतात म्हणून युनिव्हर्सल ॲक्सेप्टर (Acceptor) म्हणतात.
रक्तगट बॉम्बे ब्लड गृप (Bombay Blood Group) oh रक्तगटाचा शोध डॉ.वाय.एम.भेंडे (मुंबई) 1952 मध्ये लावला., A, B, O रक्त गटाचा शोध कार्ल लॅण्डस्टेनर यांनी 1900 मध्ये लावला., रक्त हे जास्त दिवस साठविता येत नाही त्यामुळे रक्ताची गरज सतत भासते., दान केलेले रक्त 24 तास ते 7 दिवसात झिज भरुन निघते. उपाशी पोटी किंवा जेवणांनतर अर्ध्या तासापर्यत रक्तदान करु नये. रक्तदान हे संपूर्ण सुरक्षित वेदनारहित व आनंद दायी आहे.,
रक्ताविषयी थोडक्यात माहिती :-
रक्त हा जीवनचक्र चालू ठेवणारा द्रव पदार्थ आहे. त्याचे शरीराच्या शिरेतून, धमन्यामधून अभिसारण होत असते., लाल पेशी शरीरात अभिसारण प्रक्रियेत 120 दिवस लागतात.,रक्तदानामुळे रक्तातील कोलेस्टोरॉल कमी होते., कर्करोग किंवा हदयरोग सारख्या आजारांचा धोक्याचे प्रमाण कमी होते.,रक्ताद्वारे शरीरात पोषकद्रव्ये, इलेक्ट्रोलाहट्स, हार्मोस, जीवनसत्वे, एण्टीबॉडीज, उष्णता,इ. ऑक्सिजन पुरविला जातो.,रक्त शरीरातून निरुपयोगी पदार्थ आणि कार्बनडॉय ऑक्साईड बाहेर टाकण्यास मदत करते.
रक्त व रक्त घटक :-
रक्तदानानंतर काही रुग्णांना पूर्ण रक्त (व्होल ब्लड) देण्याऐवजी रक्तघटक वेगवेगळे (तांबडयापेशी, पांढर्‍यापेशी (ग्रन्यूलोसाईड) प्लाझमा, प्लेटलेटस् (रक्त कणिका) केले जातात. त्याला (कंपोनंटस्) रक्तघटक असे नाव आहे.
दि.1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक दिनाच्या निमित्ताने समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करुन जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करुन स्वेच्छिक रक्तदानास  प्रवृत्त करणे हे आहे. तसेच  ज्यांनी आतापर्यंत 25,50,75,100 वेळा ऐच्छिक रक्तदान केले आहे. त्यांना व्यक्तीश: धन्यवाद देता. तसेच माझ्याकडून केलेला हा छोटासा एक प्रयत्न म्हणूनच म्हणतो रक्तदान करुन पहा छान वाटते’.
- श्री. हेमकांत सोनार, अलिबाग, जि. रायगड

 ०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक