राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



                अलिबाग (जिमाका) दि.29 :- बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            शनिवार दि. 30 सप्टेंबर 2017 रोजी रात्रौ 12.00 वाजता डोंबिवली निवासस्थान येथून रोहा जि.रायगकडे प्रयाण.   2.00 वाजता हॉटेल मिराज रोहा येथे आगमन व राखीव.
            रविवार  दि. 01 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 6.15 वाजता  हॉटेल मिराज रोहा येथून ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी सोहळ्याकडे प्रयाण.  6.30 वाजता ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या पालखी  सोहळा येथे आगमन व शासकीय मानवंदना सोहळ्यास उपस्थिती.  9.00 वाजता रोहा येथून पेणकडे प्रयाण.  11.00 वाजता पेण येथे आगमन व भारतीय जनता पार्टी पेण शहर कार्यालयास भेट.  11.45 वाजता पेण येथून खालापूरकडे प्रयाण.  दुपारी 1.00 वाजता देवेंद्रजी साटम यांची भेट व राखीव.  स्थळ : हॉटेल साहेब चौक ता.खालापूर.  3.00 वाजता भारतीय जनता पार्टी खांदा कॉलनी कार्यालयाचे उद्घाटन व बैठक.  सायंकाळी 4.00 वाजता जनसंपर्क कार्यालय उद्घाटन स्थळ : श्री रामजीभाई येरा नगरसेवक खारघर पनवेल महानगरपालिका.  4.30 वाजता डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक