शिवछत्रपती क्रीडापीठातंर्गत विविध क्रीडा प्रबोधिनी मध्ये सन 2022-23 सरळ प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे निवासी व अनिवासी प्रवेश प्रक्रिया सुरू

 

अलिबाग, दि.04 (जिमाका):- महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, क्रीडासुविधा, क्रीडाप्रबोधिनींच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत. राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळसेवा प्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे.

क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ प्रवेश प्रक्रिया व खेळनिहाय कौशल्य चाचणी अर्हता पुढीलप्रमाणे आहे. सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेला खेळाडू ज्यांचे वय 14, 17 व 19 वर्षा आतील मुले-मुली आहेत अशा खेळाडूंना संबधीत खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जातो.

खेळनिहाय कौशल्य चाचणी: क्रीडा प्रबोधिनीमध्ये समाविष्ट खेळात राज्यस्तरावर सहभागी व ज्यांचे वय 14, 17 व 19 वर्षाचे आत मुले-मुली आहेत अशा खेळाडूंची खेळनिहाय कौशल्य चाचणी आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश दिला जाईल.

अनिवासी प्रवेश प्रक्रिया: अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय स्थान प्राप्त करणा-या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.

समाविष्ट खेळप्रकार:

आर्चरी, ज्युडो, हॅन्डबॉल, अथलेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शुटींग, कुस्ती, हॉकी, टेबल टेनिस, वेटलिफ्टींग, जिम्नॅस्टीक्स.

या चाचण्यांसाठी पात्र खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्जासोबत जन्म तारखेचा दाखला, आधारकार्ड, क्रीडाप्रमाणपत्रे जोडून जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड येथे 11 मे 2022 पर्यंत सादर करावेत व रायगड जिल्ह्यातील उदयोन्मुख खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक श्री.संदिप वांजळे (9850954237), क्रीडा मार्गदर्शक श्रीमती मनिषा मानकर (7020555329) या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक