उरण विधानसभा मतदार संघातील निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा





अलिबाग (जिमाका) दि.25 : 190-उरण विधानसभा मतदार संघ येथील रा.जि.प.मराठी शाळा जासई येथे आचार संहिता पथक, खर्च नियंत्रण समिती व इतर समित्यांचे नोडल अधिकारी यांच्याकडून निवडणूक विषयक तयारी व कामकाजाचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी  (मंगळवार दि.24 सप्टेंबर रोजी ) घेतला आढावा.
यावेळी डॉ.सुर्यवंशी म्हणाले, विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक विषयक सर्व कामकाजांची तयारी झाली आहे.  त्या अनुषंगाने उरण विधानसभा मतदार संघात 327  मतदान केंद्र असून ते एकूण 174 स्थानांच्या ठिकाणी आहेत.   या मतदार संघात एकूण 2 लाख 92  हजार 951 इतके मतदार असून पुरुष मतदार संख्या 1 लाख 47 हजार 198 व स्त्री मतदार संख्या 1 लाख 45 हजार 650 व इतर 3 मतदार आहेत. निवडणूकीचे काम नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पारदर्शक,नियोजनबध्द व निपक्षपाती करावे.
  तसेच दि.बा.पाटील मंगळ कार्यालय जासई येथे क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत निवडणूक कामाबाबत सूचनापर मार्गदर्शन करताना एक चूक देखील निवडणूकीच्या केलेल्या चांगल्या कामाचे नुकसान करु शकते. त्यामुळे निवडणूकीचे काम करताना आपणावर कोणी निवडणूकीचे काम लादलेले आहे असे न समजता निवडणूक प्रक्रियेदरम्यान करावयाचे कामकाज समजून घेऊन आनंदाने काम केले तर ते काम योग्यरितीने बिनचूक पूर्ण करता येते.  क्षेत्रीय अधिकारी यांनी वयोवृध्द मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदानासाठी निवडणूक आयोगामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधा विषयी माहिती देऊन त्यांचे जास्तीत जास्त मतदान होईल ते पहावे.  मतदार संघातील मतदानाची टक्केवारी अधिकाधिक वाढावी यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
यावेळी 190-उरण विधानसभा मतदारंसघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम.अश्विनी पाटील तसेच नोडल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक