जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग कार्यालयातील जुन्या साहित्यांचा जाहीर लिलाव

 


अलिबाग,जि.रायगड,दि.03 (जिमाका) :- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड-अलिबाग, राऊतवाडी, वेश्वी अलिबाग यांच्या कार्यालयाचे जुने नादुरुस्त लाकडी व लोखंडी फर्निचर, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक  साहित्य, गाडीचे जूने पार्टस जाहीर लिलावाद्वारे विकण्याची कार्यवाही मंगळवार, दि.4 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. संबंधित साहित्य पाहण्याकरिता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा तसेच अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र.02141-295418 वर संपर्क करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक