जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावामुळे इयत्ता 1 ते 9 आणि इयत्ता 11 वी चे सर्व वर्ग बंद करण्याबाबतचे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आदेश जारी

 


अलिबाग, दि.5(जिमाका):- जिल्ह्यातील कोविड-19 विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये होऊ शकणाऱ्या कोविड-19 विषाणूचा संभाव्य संक्रमणाचा धोका विचारात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी रायगड डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी साथरोग अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 मधील कलम 25 व 30 महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 नियम 10 अन्वये रायगड जिल्हा क्षेत्रातील पनवेल महानगरपालिका, सर्व नगरपरिषदा, सर्व नगरपंचायती व ग्रामीण क्षेत्रातील इयत्ता 1 ते 9 आणि इयत्ता 11 वी चे सर्व वर्ग बंद करणे, सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांबाबत बंदचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशाप्रमाणे इ. 1 ली ते 9 वी आणि इ. 11 वी चे वर्गामधील प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन दि.05 जानेवारी 2022 पासून दि.31 जानेवारी 2022 पर्यंत बंद राहील,  इ.1 ली ते 9 वी आणि इ. 11 वी चे वर्गामध्ये ऑनलाईन (Online Education) पध्दतीने अध्ययन अध्यापन शासन स्तरावरून वेळोवळी देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सुरु राहील,  इ. 10 वी व 12 वी ची बोर्डाची परीक्षा जाहीर झाली असून विद्यार्थ्यांचे माहे जानेवारी व फेब्रुवारी 2022 मध्ये अंतर्गत मूल्यमापन व प्रात्यक्षिक परीक्षा असल्याने इ. 10 वी व 12 वी चे वर्गामध्ये कोविड-19 विषयक नियमांचे पालन करुन प्रत्यक्ष अध्ययन, अध्यापन पूर्ववत सुरु राहील,  वय वर्ष 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण आवश्यक राहील,  यापूर्वी लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध लागूच राहतील.

कोविड-19 विषाणूचा वाढत्या प्रादूर्भावामुळे व रुग्णसंख्येमुळे शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडील दि.30 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये दि.31 डिसेंबर 2021 पासून राज्यात अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले. सद्य:स्थितीत राज्यात व रायगड जिल्ह्यामध्ये कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव पुन्हा वाढत असून दिवसेंदिवस रुग्णसंख्येत देखील वाढ होत आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण आणण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे. त्यानुसार वेळोवेळी शासन स्तरावरुन तसेच या कार्यालयाच्या स्तरावरून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आलेले आहेत.

या आदेशाचे उल्लघंन करणारी व्यक्ती/आस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार कारवाईस तसेच भारतीय दंड संहिता 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन दंडात्मक कायदा 2005 च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक