खालापूर तालुक्यातील महड येथे अवैध थाई मागूर माशांचे संवर्धन करणाऱ्या इसमावर कारवाई

 


 

अलिबाग, दि.5 (जिमाका):- राष्ट्रीय हरित लवाद, नवी दिल्ली (National Green Tribunal, New Delhi ) यांनी दि. 22 जानेवारी 2019 रोजीच्या आदेशानुसार अवैध थाई मागूर माशांच्या (Clarias gariepineus) प्रजनन, मत्स्यपालन, वाहतुक व विक्री करण्यावर बंदी घातली असून, प्रतिबंधित मागूर माशांचे अस्तित्वात असलेले मत्स्यसाठे नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार (दि.4 जानेवारी 2022) रोजी  प्रादेशिक उपआयुक्त, मत्स्यव्यवसाय महेश देवरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, श्री.सुरेश भारती यांच्यासह सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्रीम.अजया भाटकर, चेतन निवळकर व परवाना अधिकारी श्रीम.रश्मी आंबुलकर यांनी खालापूर तालुक्यातील महड येथे अवैध थाई मागूर माशांचे संवर्धन करणाऱ्या इसमावर पोलीस स्टेशन, खालापूर येथे कलम 188 शासन आदेशाचा अवमान करणे, कलम 268 सर्व लोकांना सामाईकपणे होणारे नुकसान, धोका अगर त्रास होतो, अगर त्यांना कोणताही सार्वजनिक हक्क वापरण्याचा प्रसंग येईल त्या व्यक्तींना नुकसान, अटकाव धोका किंवा त्रास होणे अपरिहार्य आहे, अशी कोणतीही कृती करणारी किंवा कोणत्याही बेकायदेशीर अकृतीबद्दल दोषी असणारी व्यक्ती सार्वजनिक उपद्रवाबद्दल दोषी असते, कलम 273 अपायकारक पदार्थ तो अपायकारक आहे, असे माहीत असूनदेखील त्याची जाणूनबुजून विक्री या कलमांतर्गत एफआयआर करुन गुन्हा दाखल केला आहे.

 महड येथील या इसमाच्या तळ्यातील बेकायदेशीर थाई मागूरचा साठा जप्त करून नष्ट करण्याची कारवाई विभागाकडून करण्यात येत आहे, असे सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, श्री.सुरेश भारती यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक