महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत “हॅम रेडिओ” वापराचे प्रशिक्षण संपन्न

 

अलिबाग, दि.01 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत हॅम रेडिओ वापराबाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

या प्रशिक्षणास महाड तहसिलदार सुरेश काशीद, पोलादपूर तहसिलदार दीप्ती देसाई, गटविकास अधिकारी श्री.पोळ, महाड गटविकास अधिकारी श्री.जगताप, पोलादपूर तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, विविध रेस्क्यू टीम, हॅम रेडिओ वापराचे ज्ञान असलेले काही स्वयंसेवक उपस्थित होते.

उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना हे प्रशिक्षण श्री.नितीन ऐनापुरे यांनी दिले.

डायरेक्टर नितीन अँड कंपनी यांनी महाडच्या पूरामध्ये अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये हॅम रेडिओचा वापर करून संपर्क यंत्रणा निर्माण केली होती.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक