आदिवासी समाजामधील पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा

 

अलिबाग,दि.01 (जिमाका):- आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरिता आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, जि.रायगडमार्फत प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील (जिल्हा रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग) आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता नृत्य पथकांनी दि.08 जून 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालय, पेण येथे अर्ज सादर करावेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या पथकातील कलाकारांना मानधन, येण्या-जाण्याचा प्रवास खर्च, दैनिक भत्ता, पेहराव भत्ता मिळणार आहे.

प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समाजामधील विविध जमातींच्या पारंपारिक नृत्य पथकांनी आदिवासी पारंपारिक नृत्य स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी श्रीमती शशिकला अहिरराव यांनी केले आहे.

00000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक