“कातकरी उत्थान अभियान” सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत खालापूर येथे ई-श्रम कार्ड नोंदणी शिबीर संपन्न 128 ई-श्रम कार्डची झाली नोंदणी

 


 

अलिबाग, दि.01 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत स्थलांतरण रोखणे व रोजगार निर्मिती च्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील मौजे भिलवले येथील कातकरी आदिवासीवाडी येथे ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 128 ई-श्रम कार्डची नोंदणी करण्यात आली.

यावेळी तेथील तलाठी, ग्रामसेवक, स्वयंसेवी संस्था, कामगार उपायुक्त कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक