गृहनिर्माण सहकारी संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियानात सहकारी संस्थांनी सहभागी व्हावे -सहाय्यक निबंधक अशोक मोरे

 


अलिबाग, दि.01 (जिमाका):- अलिबाग तालुक्यात मार्च 2022 अखेर एकूण 457 गृहनिर्माण सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पुरस्कृत अभियानानुसार गृहनिर्माण सहकारी संस्था सुव्यवस्थापन आणि तंटामुक्त संस्था अभियान दि.01 मे 2022 ते दि.30 एप्रिल 2023 या कालावधीत राबविण्याचे निश्चित केले आहे.

तरी अलिबाग तालुक्यातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन सहकारी संस्था, सहाय्यक निबंधक अशोक धों. मोरे यांनी केले आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक